आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO- टँकरच्‍या धडकेत पती-पत्‍नीसह दोन चिमुकले ठार; बडोदा येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा कालोला (जि. पंचमहाल) येथील टोलनाक्‍याजवळ रस्‍त्‍याच्‍या कडेने उभ्‍या असलेल्‍या दुचाकीला सुसाट वेगाने आलेल्‍या टँकरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एकाच परिवारातील चार व्‍यक्‍ती जागीच ठार झाल्‍या तर ट्रँकर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना काल (रविवारी) घडली. मृतामध्‍ये पती-पत्‍नी आणि त्‍यांच्‍या दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संतप्‍त झालेल्‍या शेकडो लोकांनी टोलनाक्‍याची तोडफोड करून लूटपाट केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्‍यात घेतले आहे.
प्राप्‍त माहितीनुसार, बडोदा येथील एका खासगी कंपनीमध्‍ये काम करणारे लालजीभाई हे त्‍यांची पत्नी भारतीबेन (28), मुलगा साहील (5) आणि मुलगी तुळसी (3) यांना घेऊन पावागड येथे दर्शनासाठी जात होते. दरम्‍यान, आराम करण्‍यासाठी टोलनाक्‍याजवळ रस्‍त्‍याच्‍या कडेने दुचाकी उभी करून ते थांबले. मात्र, एका ट्रकला ओव्‍हरटेक करण्‍याचा प्रयत्‍न करत असलेल्‍या ट्रँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हे चौघे जण जागीच ठार झालेत.
सोमवार सकाळी निघाली अंत्‍ययात्रा
या अपघात एकाच कुटुंबातील चार व्‍यक्‍ती जागीच ठार झाल्‍या असून, आज (सोमवारी) बडोराच्‍या मांजलपुरा परिसरातील त्‍यांच्‍या घरातून अंत्‍ययात्रा निघाली. यामध्‍ये सहभागी प्रत्‍येकाला शोक अनावर झाला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा शोकाकूल झालेले नातेवाईक