आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friendship Day Celebration Issue And Tomato Festival News In Marathi

भाजीलाही न सापडणारे टोमॅटो श्रीमंतांनी पायाखाली तुडवले, 3000 किलोंचा चुराडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - विदेशातील 'टोमॅटो' फेस्टिव्‍हलवर आधारित बडोद्यामध्‍ये 'फ्रेंडशिप डे' च्‍या सेलिब्रेशनसाठी 'ला-टोमेन्टिनो फेस्टिव्‍हल'चे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये मनोरंजनासाठी 3000 किलो टोमॅटोचा अतिरेकी वापर करण्‍यात आला. टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव आणि येथे चाललेली नासधूस याप्रकरणी जिल्‍हाधिका-यांनी पार्टीच्‍या आयोजकांना नोटीस बजावली आहे.

'ला-टोमेन्टिनो फेस्टिव्‍हल'च्‍या आयोजकांना जिल्‍हाधिका-यांनी 1.80 लाख मनोरंजन कर आणि कार्यक्रमाची परवानगी न घेतल्‍यामुळे 2.70 लाखांचा पेनल्‍टी जमा न केल्‍यामुळे नोटीस बजावली आहे. या नोटिसची सुनावणी 13 ऑगस्‍ट रोजी होणार असून लीलेरिया पार्टीच्‍या आयोजकाला उपस्थित कोर्टात राहण्‍याचे आदेश दिले आहेत.
'फ्रेंडशिप डे'च्‍या सेलिब्रेशनसाठी फोर.एस इन्टरटेंमेंट कंपनीद्वारे 'ला-टोमेन्टिनो फेस्टिव्‍हल' पार्टीचे आयोजन केले होते. त्‍यामध्‍ये तब्‍बल 3000 किलो टोमॅटोचा वापर झाला आहे. पार्टीमध्‍ये प्रत्‍येकाला प्रवेशमुल्‍य 300 रुपये होते.
एकीकडे टोमॅटोच्‍या गगनाला भिडलेल्‍या किंमती अन् दुसरीकडे 3000 किलो टोमॅटोचा मनोरंजनासाठी अपव्‍यय होत असल्‍याने स्‍थानिक लोकांनीही 'ला-टोमेन्टिनो फेस्टिव्‍हल'ला विरोध दर्शविला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, 'ला-टोमेन्टिनो फेस्टिव्‍हल'मध्‍ये तरुणाईच्‍या धम्‍मालची छायाचित्रे...