आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gang Raped Girl Asked To Permission From Highcourt For Pregnancy

सात महिने बलात्काराची शिकार झालेल्या महिलेचा आता गर्भपातासाठी लढा, वाचा आपबीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये एका 24 वर्षांच्या विवाहितेचे अपहरण करुन सलग सात महिने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यातून गर्भवती राहिलेल्या पीडित महिलेने गुजरात हायकोर्टाकडे मागितलेली गर्भपाताची परवानगी कोर्टाने कायद्याचा हवाला देऊन नाकारली आहे. गर्भाचा कालावधी 20 आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास कायद्यानुसार गर्भपातास परवानगी देता येत नाही. न्यायालय परवानगी देऊ शकत नसल्यामुळे तिला नको असलेला गर्भ वाढवावा वागणार असून त्या बाळाला जन्म द्यावा लागणार आहे. जन्माला आलेल्या बाळाला सरकार कशी मदत करणार, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे.
पीडित महिलेच्या आईने काही लोकांविरुद्ध कबूतर चोरीची तक्रार दिली होती, त्याचा बदला घेण्यासाठी तिच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सात महिने गँगरेप करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच पीडिता गुंडाच्या तावडीतून पळून येण्यात यशस्वी झाली आणि तिने बलात्कारातून राहिलेला गर्भ नको असल्याची कोर्टाला विनंती केली. या महिलेसोबत आमच्या समुहाच्या (दिव्यभास्कर डॉट कॉम) वेबसाइटने बातचीत केली, त्यात तिने आपबीती सांगितली, जी ऐकून अंगावर काटा उभा राहातो.

'सात महिन्यानंतर बलात्कारी गुंडांच्या तावडीतून सुटल्यानंतर मी माझ्या गावी पोहोचले. मी माझ्या आईला फोन केला तेव्हा आईने सांगितले, की पोलिस तिच्यावर दबाव टाकत आहेत, की तुमच्या मुलीला त्या लोकांच्या (आरोपी) हवाली करा, कारण तिने त्यांच्यासोबत मैत्री करार केला आहे. त्या कागदांवर माझा बळजबरीने अंगठा घेण्यात आला होता.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा पीडितेची आपबीती तिच्याच शब्दात....