आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅरेज कामगाराचा मुलगा गेट परीक्षेत टॉप-10 मध्ये; पिनल राणाचा गेटमध्ये सहावा क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंभात (गुजरात)- गॅरेजमध्ये काम करणारे गोपालभाई राणा यांच्यासाठी आनंदाचा क्षण होता. त्यांचा मुलगा पिनल राणा याचे देशातील अग्रगण्य अशा मुंबई आयआयटीमधून अभियांत्रिकीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. पिनल राणाने गेट (Graduate Aptitude Test in Engineering) मध्ये सहावा क्रमांक मिळवला. त्याच्या या उत्तुंग यशामुळे बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद येथून प्रवेश देण्यासाठी “कॉल लेटर’ आले आहेत. मात्र त्याला मुंबईत प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याने सांगितले, आधी तुम्ही तुमचे उद्दिष्ट ठरवा. तुम्ही कोठे शिकताहात यापेक्षा किती अभ्यास करता ? आणि किती चिकित्सक आहात? हे खूप महत्त्वाचे ठरते. 

पिनल यास हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळाले असेही नाही. पहिल्या परीक्षेत त्याला केवळ ४० गुण मिळाले होते. तो निराश झाला नाही. त्याने नोकरी करत अभ्यास केला. ४ फेब्रुवारीस परीक्षा दिली आणि २८ मार्च रोजी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. १००० पैकी त्याला ८८४ गुण मिळाले.  गेट च्या गुणवत्ता यादीत त्याला ६ वा क्रमांक मिळाला. आता तो मुंबई आयआयटीत प्रवेश घेणार आहे. 

पिनलने कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला नाही
गोपाल राणा म्हणाले - आम्ही ५० वर्षंापासून एका खोलीत भाड्याने राहतो. गरिबीत मुले लहानाची मोठी झाली. परंतु त्यांनी कसल्या गोष्टीची तक्रार केली नाही. भाड्याचे घर होते पण मुलांनी त्या घराला जिवंतपणा आणला. माझे फारसे शिक्षण झालेले नाही. गॅरेजवर येणाऱ्या लोकांचे ऐकून मुलांना उच्च शिक्षण देण्याचे ठरवले. पिनलने कोणत्याही गोष्टीचा हट्ट कधी धरला नाही.

घरात टीव्ही नाही : सोनल (आई)
मला टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्याची खूप आवड होती. मात्र, माझी दोन मुले हिरेन आणि पीनल यांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत, त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून पिनल १२ वी पास होईपर्यंत आम्ही टीव्हीसुद्धा विकत घेतला नव्हता, असे त्याची आई सोनल यांनी सांगितले.

कशाची कमतरता भासू दिली नाही 
पिनलच्या घरचे गेल्या ५० वर्षांपासून भाड्याच्या घरात राहतात. वडील गॅरेजमध्ये काम करतात. मात्र, त्यांनी मुलांना कोणत्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. मोठा मुलगा हिरेन याने १२ वीनंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. त्यानंतर लहान भावासाठी  पुढे शिक्षण घ्यायचे नाही, असे ठरवले. 
बातम्या आणखी आहेत...