आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरब्याच्या रंगात काही असा रंगला गुजरात, तरुणाईचा उत्साह शिगेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव गरबा सध्या देशभरात मोठ्या उत्साहात सुरु आहे. देवीची अराधना आणि गरबा नृत्याची मस्ती असा मिलाफ सध्या जिकडे तिकडे पाहायला मिळत आहे. शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाल्यानंतर जसजसे दिवस जात आहेत तसा गरब्याला रंग चढत जात आहे. मग अहमदाबाद असेल नाही तर बडोदा, राजकोट किंवा हिरानगरी सूरत. गुजरातच्या प्रत्येक शहरात गरब्याचा उत्साह भरून राहिला आहे.

युवक-युवतींवर याचा या उत्सवाचा अंमल जरा जास्तच आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवर गरब्याचा रंग चढला आहे. अहमदाबादच्या मणिनगर येथे स्थानिकांसह विदेशी पर्यटकही विविध स्टाइलमध्ये गरबा खेळताना दिसले आहेत. त्याशिवाय युवतींचा पेहराव विशेष आकर्षणाचा केंद्र ठरत आहे. डोक्यावर घागर आणि रंगीत छत्र्यां घेऊन युवतींचा नृत्याविष्कार डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अहमदाबादमधील गरब्यातील तरुणाई..