राजकोट- गरबा-दांडियाचा पहिला आठवडा सरला. विकेंडही मागे पडला. आता बोटांवर मोजता येतील एवढे दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर थेट पुढल्या वर्षी गरबा दांडियाचा आस्वाद लुटता येणार आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमांना चांगलाच रंग चढताना दिसून येतो. तरुणाईतील अफाट जल्लोष या निमित्ताने झळकताना दिसतोय. पारंपरिक वेशातील गोपिका या निमित्ताने विशेष चालिंवर थिरकताना दिसतात. उपस्थितांना मोहिनी घालतात.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, गुजरातच्या राजकोट आणि गांधीनगर या शहरातील गरब्याचे ताजे फोटो....