आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात: सरकारी हॉस्पिटलच्या ICU मध्ये गरबा, व्हिडिओ झाला व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सरकारी हॉस्पिटलमधील अती दक्षता विभागात (आयसीयू) गरबा खेळण्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री त्यावेळी हॉस्पिटलच्या पाहाणी दौऱ्यासाठी आले होते. सोला सिव्हिल हॉस्पिटलमधील या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी सोमवारी हॉस्पिटल सजवण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये साग्रसंगीत सोहळा रंगला होता.

काय आहे व्हिडिओमध्ये
>> सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेव्हा गरबा सुरु होता तेव्हा आयसीयूमध्ये पेशंट खाटांवर पडलेले होते.
>> हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल स्टाफ गरबा करताना दिसतात.
>> गरबा खेळण्यासाठी आयसीयूमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजत होती.

आरोग्य मंत्री काय म्हणाले
>> आयसीयूमध्ये गरबा खेळण्याचे प्रकरण गुजरात सरकारने गांभीर्याने घेतले आहे.
>> गुजरातचे आरोग्य मंत्री नितीन पटेल म्हणाले, माझा हॉस्पिटलमधील दौरा संपल्यानंतर हा खेळ झाला. त्याबाबत माझ्याकडे माहिती नाही.
>> पटेल म्हणाले - सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून असे का झाले ? याचा अहवाल मागवला आहे.
बातम्या आणखी आहेत...