आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : बडोद्यात रेव्ह पार्टीत जर्मन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदरा - गुजरातमध्ये वडोदरा येथे जर्मनीतील एका विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रेव्ह पार्टीच्या वेळी घडल्याचे सांगण्यात आले. ही विदेशी तरुणी एका आदान-प्रदान कार्यक्रमासाठी येथे आली होती. ती संघरोट येथे एका सामाजिक संस्थेत काम करते व गेल्या नऊ महिन्यांपासून वडोदऱ्यात राहत होती. सहपोलिस आयुक्त डी. जी. पटेल यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या बोलावण्यावरुन मी रुग्णालयात गेलो. तेथे तरुणीची चौकशी केली असता बलात्काराची घटना उघड झाली. वडोदऱ्याजवळ आंकलाव येथे फार्म हाऊसवर गेल्या आठवड्यात रेव्ह पार्टी झाली. पीडित तरुणी जर्मन मित्रासोबत पार्टीला गेली होती. ही पार्टी तीन दिवस चालली. त्या वेळी तरुणीवर अत्याचार करण्यात आले.
तिची मानसिक िस्थती ठीक नसल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिस वाट पाहत आहेत.
बातम्या आणखी आहेत...