आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Woman Sexually Allegedly Assaulted In Gujarat

गुजरातमध्ये जर्मन महिलेवर बलात्कार, कोल्ड्रिंक्समध्ये दिले गुंगीचे औषध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- गुजरातमध्ये एका जर्मन महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मानसोपचार तज्ज्ञाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून ‍मिळालेल्या माहितीनुसार, बडोदापासून जवळच असलेल्या उमेटा येथील एका फार्महाऊसवर गेल्या आठवड्यात ही घटना घडली. नराधमाने महिलेला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून तो पसार झाला. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिने शहरातील मानसोपचार तज्ज्ञ योगेश पटेल यांच्याशी संपर्क साधून 'आपबिती' कथन केली. डॉ.योगेश पटेल यांनी पोलिसांना या घटनेविषयी माहिती दिली. पीडित महिला मानसिक परिस्थिती ठीक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर तपासाची चक्रे फिरवली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.