आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये शंभर आदिवासी ख्रिश्चनांची ‘घर वापसी’! विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वलसाड - दक्षिणगुजरातमधील वलसाड येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘घर वापसी‘ कार्यक्रमात सुमारे शंभर आदिवासी ख्रिश्चन नागरिकांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून देशभर सुरू असलेल्या धर्मांतराच्या प्रक्रियेत बहुतांश आदिवासी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करत आहेत.

वलसाडमधील अरनाई गावात शनिवारी धर्म परिवर्तनाचा हा कार्यक्रम पार पडला. हिंदू धर्मात प्रवेश केलेले सर्व ख्रिश्चन नागरिक यापूर्वी हिंदू धर्मातच होते. हिंदू धर्माचे रिती-रिवाज ते पाळत होते. आता या सर्वांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे विहिंपकडून सांगण्यात आले.

कोणलाही सक्ती नाही
हिंदूधर्म स्वीकारावा म्हणून कोणत्याही नागरिकाला देशात सक्ती करण्यात आली नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. यापूर्वी आग्रा येथे नुकत्याच झालेल्या अशाच एका कार्यक्रमात ५७ मुस्लिम कुटुंबीयांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. मात्र, या धर्मांतरानंतर प्रचंड वाद निर्माण झाला होता. या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारावा म्हणून त्यांच्यावर सक्ती करण्यात आल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. मात्र, याचा हिंदुत्ववादी संघटनांनी स्पष्टपणे इन्कार केला होता.
वलसाडचे विहिंपचे प्रमुख अजित सोलंकी म्हणाले, की ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या नागरिकांना शिक्षण अन्नही पुरेसे मिळत नव्हते. मूळ हिंदू असलेले आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी यानंतरच्या काळातही आपले प्रयत्न सुरूच राहतील, असा निर्धार सोलंकी यांनी व्यक्त केला.

या प्रकरणी गुजरात सरकारचे प्रवक्ते नितीन पटेल यांनी सांगितले, की वलसाड येथे झालेल्या धर्मांतराच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची सक्ती झाल्याची तक्रार सरकारकडे आलेली नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही. प्रत्येकाला कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे.