फोटोग्राफी क्षेत्रामध्ये गुजरातमधील अनेक फोटोग्राफर राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय स्थरावर देशाची प्रतिष्ठा वाढवत आहेत. सध्या गुजरातधील युवकांमध्ये फोटोग्राफीचा छंद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपला आवडता छंद पूर्ण करण्यासाठी महागडा कॅमेरा घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी युवकांमध्ये दिसत आहे.
फोटोग्राफीचा छंद असणा-या पैकी एक युवक म्हणजे राजकोटचा तपन सेठ. सॉफ्टवेयर इंजीनियर असलेल्या तपनला फोटोग्राफी करण्याचा छंद आहे. यासाठी महागडा कॅमेरा घेण्याबरोबरच त्याने फोटोग्राफी संदर्भातील ट्रेनिंगही घेतले आहे. यासाठी गुजरातचे प्रसिद्ध फोटोग्राफर योगेंद्र शाह यांचे मार्गदर्शन तपन सेठ यांनी घेतले आहे. दोन-तीन महिन्याच्या ट्रेनिंगनंतर गुजरातमधील 'गिर'च्या जंगलात तपन सेठने काढलेली काही छायाचित्रे तुमच्यासाठी देत आहोत.
पुढील स्लाईडवर पाहा छायाचित्रे...