आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल म्हणाले, ‘खुद को खुश रखने के लिए खयाल अच्छा है’; जेटली-राहुल यांच्यात शाब्दिक चकमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरुचमधील रोड शोदरम्यान एका तरुणीने राहुल यांना भेटण्यासाठी चक्क त्यांच्या वाहनावर ठिय्या दिला होता. अखेर राहुल तिला भेटले. मग हस्तांदोलन आणि सेल्फी झाला. त्यानंतर राहुल व सुरक्षा रक्षकांनी तिला हाताला धरून वाहनावरून खाली उतरवले. - Divya Marathi
भरुचमधील रोड शोदरम्यान एका तरुणीने राहुल यांना भेटण्यासाठी चक्क त्यांच्या वाहनावर ठिय्या दिला होता. अखेर राहुल तिला भेटले. मग हस्तांदोलन आणि सेल्फी झाला. त्यानंतर राहुल व सुरक्षा रक्षकांनी तिला हाताला धरून वाहनावरून खाली उतरवले.
नवी दिल्ली- इझ ऑफ डुइंग बिझनेसवरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेते अरुण जेटली यांच्यात ट्विटरवरून बुधवारी शाब्दिक चकमक झडली. ‘सबको मालूम है इझ ऑफ डुइंग बिझनेस की हकीकत क्या है, लेकिन खुद को खुश रखने के लिए ‘डॉ. जेटली’ ये खयाल अच्छा है’, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांना गालिब शैलीत कोपरखळी मारली. इझ ऑफ डुइंग यूपीएच्या काळात भ्रष्टाचार होता. आता तो बिझनेस झाला आहे, अशी टीका जेटली यांनी आपल्या ट्विटमधून केली.  

गुजरातच्या दौऱ्यावर असलेले राहुल यांनी एका जाहीर सभेत जेटलींवर टीका केली. राज्यातील लघु व मध्यम उद्योगांची स्थिती बिकट बनली आहे. अशा उद्योगपतींना जेटलींनी जागतिक बँकेतील भारताच्या कामगिरीबद्दल थोडे समजावून सांगायला हवे. खरे तर संपूर्ण देश आेरडून सांगेल. इझ ऑफ डुइंग बिझनेस करणे सोपे नाही. तुम्ही सगळे काही संपवले. आता उद्योग शिल्लक राहिलेला नाही. नोटबंदी व जीएसटीच्या आघातामुळे त्याला उद्ध्वस्त करून टाकले आहे, अशी टीका त्यांनी केली.  

दरम्यान, इझ ऑफ डुइंगबाबत जागतिक बँकेचा अहवाल मंगळवारी जाहीर झाला होता. त्यात भारताने १३० वरून १०० अशी झेप घेतल्याचे त्यात म्हटले होते. नवीन कररचना, परवाना, गुंतवणूकदारांना संरक्षण, दिवाळखोरीवरील नवीन उपाययोजनांमुळे भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली होती.  त्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांत चकमक उडाली होती.
 
कर्जमाफी करण्याऐवजी उद्योगपतींना पैसे दिले  
गुजरातमधील शेतकऱ्यांना त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करायचा आहे. परंतु मोदीजी मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी ते केले नाही. आता शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी टाटा नॅनोसाठी ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मग कंपन्यांना देण्यासाठी पैसा होता, तर शेतकऱ्यांना देण्यासाठी का नाही? एवढा पैसा त्यांनी उद्योगांना दिला, पण नॅनो कार काही रस्त्यावर दिसली नाही. हेच मोदींचे गुजरात माॅडेल आहे का, असा प्रश्न राहुल यांनी सभेतून विचारला. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रदेखील उद्योगांच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. खरे तर केंद्रातील मोदी सरकार मेक इन इंडियाच्या माध्यमातून केवळ पाच-दहा उद्योगांचे हित रक्षण करण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...