आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियाच्‍या चाहतीची आत्‍महत्‍या, देवानंदच्‍या मृत्‍यूनंतर पित्‍यानेही दिला होता जीव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुज- अभिनेत्री जिया खानने शारिरीक आणि मानसिक शोषणाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तर जिया खानच्‍या आत्‍महत्‍येचा धक्‍का बसल्‍याने गुजरातमध्‍ये एका 13 वर्षांच्‍या मुलीने आत्‍महत्‍या केली. ही मुलगी जिया खानची चाहती होती. परंतु, या घटनेत एक दुर्दैवी योगायोग असा की तिच्‍या वडीलांनी अभिनेता देव आनंद यांच्‍या मृत्‍यूनंतर आत्‍महत्‍या केली होती.

प्राप्‍म माहितीनुसार, या मुलीचे नाव जेसिका मकवाना असे आहे. तिचा मृतदेह घरात पंख्‍याला लटकलेला आढळला. तिने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. जेसिका हुबेहूब जिया खानसारखी दिसायची. त्‍यामुळे तिच्‍या मैत्रिणी तिला जिया नावानेच हाक मारायच्‍या. जिया खानच्‍या आत्‍महत्‍येची बातमी कळल्‍यानंतर जेसिका अतिशय अस्‍वस्‍थ झाली होती. तिने जिया खानला अनेक पत्र लिहीली होती. तिने ती कधी पाठविली नाही. अशी 20 पत्र तिच्‍या खोलीतून आढळली आहेत.

जेसिकाचे वडील नरसिंह मकवाना यांनीही अशाच प्रकारे आत्‍महत्‍या केली होती. ते देव आनंदचे मोठे चाहते होते. देव आनंद यांच्‍या निधनानंतर दोनच दिवसांनी नरसिंह मकवाना यांनी आत्‍महत्‍या केली होती.

जिया खानच्‍या मृत्‍यूनंतर राजस्‍थानच्‍या श्रीगंगानगर जिल्‍ह्यात एका 12 वर्षांच्‍या मुलानेही आत्‍महत्‍या केली होती. तो जिया खानचा चाहता होता.