अमरेली (गुजरात) - लव्ह अफेयरच्या आड येणाऱ्या भावाचा गळा चिरून खून करणाऱ्या युवतीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तिने गुन्हा कबूल केला आहे. त्यासोबतच तिने भावानंतर आई-वडिलांनाही ठार मारण्याचा प्लॅन तयार केला असल्याचे चौकशीत सांगितले. विशेषम्हणजे निकिता (नाव बदलले) 17 वर्षांची आहे तर तिने खून केलेला भाऊ सिद्धार्थ 21 वर्षांचा होता. निकिताचे वडिल रमेशभाई अरजणभाई वकील आहेत आणि आई नर्स.
वाचा युवतीचा कबूलनामा...
'माझे नवनीतवर प्रेम आहे. तो अमरेलीचे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रेमजीभाई यांचा मुलगा आहे. भाऊ (सिद्धार्थ) मला त्याला भेटू देत नव्हता. आई-वडीलही त्याला साथ देत होते. काही दिवसांपूर्वी मी टीव्हीवर क्राइम पेट्रोल पाहिले. त्यात एक महिला पतीचा खून करते, ते पाहून कल्पना सुचली. त्यात दाखवण्यात आले होते, एक महिला पतीचा खून करण्यासाठी त्याला सरप्राइज देण्याच्या निमीत्ताने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधते मग दोन्ही हात बांधते.त्यानंतर महिला पतीला खुर्चीवर बसवते आणि मागून येऊन त्याचा गळा चिरते. मला ही पद्धत पसंत पडली. सोमवारी आई-वडील दोघेही कामानिमीत्त बाहेर गेले होते. मी भावाला म्हटले चल आपण लपा-छुपी खेळू. मग मी त्याच्या डोळ्यांवर ओढणी बांधली आणि दोन्ही हात बांधले. तो म्हणाला डोळे दुखत आहेत तेव्हा मी डोळ्यांवर बांधलेली ओढणी सोडली पण हात तसेच ठेवले. मग मी किचनमध्ये गेले आणि चाकू घेऊन आले. भावाला तो खेळ वाटत होता. मी त्याला म्हटले आता मी तूला ठार मारणार. तेव्हा तो हसू लागला. मी त्याच्या छातीत चाकू खूपसला. दोन वेळा तसे केले. मग त्याच्या गळ्यावर दोन-तीन वार केले. तो जागेवरच मेला. मी रक्ताने माखलेले कपडे आणि चेहरा धुण्यासाठी बाथरुममध्ये गेले, अंघोळ केली. मग कपडे वाळात घातले. रुम पुसून घेतली. तेवढ्यात वडिलांचा फोन आला. त्यांनी विचारले काय चालेल.. मी सांगितले- काही नाही. सर्व ठीक आहे. मग भावाबद्दल विचारले तर मी सांगितले तो झोपला आहे. मग मी शेजाऱ्यांकडे गेले आणि दोन मिनीटांनी परत घरी आले. आणि मग पळत बाहेर गेले आणि सगळ्यांना ओरडून सांगू लागले, लवकर चला... भाऊला कोणी तरी मारून टाकले... लवकर चला... भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून कोणी तरी पोलिसांना फोन केला.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत फोटो...