आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधील तरुणींच्या ओल्या पार्टीने खळबळ, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही तरुणींनी ओली पार्टी केली या आशयाचे फोटो सध्या गुजरातमध्ये व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. खरंच ओली पार्टी झाली, की दुसऱ्या एखाद्या पार्टीचे फोटो सिव्हिल हॉस्पिटलच्या नावाने व्हायरल करण्यात आले आहेत याची शहानिशा करण्यात येत आहे. दरम्यान, हे फोटो आमच्या हॉस्पिटलचे नसल्याचे सिव्हिल हॉस्पिटलच्या सुप्रिटेडंटनी सांगितले आहे. पण हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचारी पुष्पाबेन चौहान यांनी सांगितले आहे, की ही पार्टी PIU (प्रोजेक्ट इम्पिलिमेंटेशन यूनिट) मध्ये झाली होती.
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाच-सहा तरुणींनी ओली पार्टी केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात जीन्स आणि टीशर्ट घातलेल्या तरुणी हातात बिअरचे ग्लास घेऊन दिसतात. सोबत त्यांनी काही सेल्फीही काढले आहेत. या तरुणींच्या चेहऱ्यावर मद्याची चढलेली नशाही दिसून येते. या फोटोंमुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. या फोटोंची सत्यता पटविण्याचे काम सुरु आहे.
पुष्पाबेन चौहान यांनी दिली तक्रार
पुष्पाबेन चौहान यांनी या प्रकरणी एसीपी मंजिता वंजारा यांच्याकडे निवेदन दिले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील PIU मध्ये काम करणारी असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरने ही पार्टी आयोजित केली होती, असे सांगितले आहे. तिच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी पुष्पाबेन यांनी केली आहे.
वाचा यावर सुप्रिटेडंट काय म्हणाले
हे फोटो आमच्या हॉस्पिटलमधील असूनच शकत नाहीत. आमच्या हॉस्पिटलमध्ये असे काही घडू शकत नाही. तरीही आम्ही या प्रकरणी विभागांतर्गत चौकशी करणार आहोत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, गुजरातमधील तरुणींच्या ओल्या पार्टीचे फोटो....
(टीप- तरुणींची ओळख समोर येऊ नये यासाठी फोटोंमधील चेहरे ब्लर्ब करण्यात आले आहेत.)
बातम्या आणखी आहेत...