आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक मुलीनेच केली आईवडीलांची निर्घृण हत्या, प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात)- आईवडीलांची हत्या केल्याप्रकरणी अल्पवयीन दत्तक मुलीच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलीच्या गुन्हावर सुनावणी सुरु असून लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. या दोघांनी दत्तक घेणाऱ्या आईवडीलांची अगदी निर्घृण हत्या केली होती.
काय आहे हे प्रकरण...
मांजलपूर येथील तिरुपती सोसायटीत राहणारे श्रीहरी पुरुषोत्तम भाई आणि त्यांची पत्नी स्नेहा यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती. मुलगी तेव्हा दहावीत शिकत होती. शहरातील वैष्णोदेवी सोसायटीतील सपन पुराणी या 21 वर्षीय मुलाच्या प्रेमात ती होती. मात्र आईवडीलांना हे प्रेमप्रकरण मान्य नव्हते. दोघेही तिला वारंवार समजवत तर कधी रागवत होते. याचा राग तिच्या मनात होता. याचा वचपा तिने त्यांच्या खून करून काढला.

प्रेमात आईवडील अडथळा होत असल्याने या मुलीने प्रियकराच्या मदतीने आईवडीलांची हत्या करण्याचे कारस्थान रचले. 3 ऑगस्टला रात्री आईवडीलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या. जेवण झाल्यानंतर स्नेहा बेडरूमध्ये तर श्रीहरी बाजूच्या खोलीत झोपले. आईवडील झोपल्यानंतर तिने प्रियकराला घरी बोलावले. या दोघांनी स्नेहाबेनच्या चेहर्‍यावर उशी ठेवली आणि त्यांच्या पोटात सुराही खुपसला. त्यानंतर याच प्रकारे या दोघांनी श्रीहरी यांनाही ठार मारले. त्यांच्या गळ्यात चाकू खुपसला. या दोघांची हत्या केल्यानंतर मृतदेह बेडरूममध्ये ठेवले. त्यानंतर मुलगी प्रियकर सपनच्या घरी राहाण्यासाठी निघून गेली.
अतिरिक्त पोलिस आयुक्त डी. जे. पटेल यांच्या समोर या मुलीने गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात तिने सांगितले की, मला आभ्यासाची आवड नव्हती. माझे आईवडील मला शिकवून डॉक्टर किंवा इंजिनिअर करणार होते. ते मला वारंवार अभ्यास करण्याचा सल्ला देत. मात्र मला ते आवडत नव्हते. माझी आणि सपनची मैत्रीही त्यांना आवडत नव्हती. ते वारंवार मला रागावून सपनशी भेटू नको असे सांगत. या सर्वच गोष्टींचा मला वैताग आला होता. त्यामुळेच मी त्यांची हत्या केली.
मुलीचा प्रियकर सपन याने सांगितले की, मला तिने धमकी दिली होती की, जर मी तिच्या आईवडीलांची हत्या करण्यात तिला मदत नाही केली तर ती आपला जीव देईल. तिच्या आत्महत्येचे कारण मी असेल. ही धमकी ऐकून मी खुप घाबरलो होतो. त्यामुळेच मी तिच्या या कटामध्ये सहभागी झालो.
पुढील स्लाईडवर वाचा....असे आले प्रकरण उघडकीस... शाळेत गेली नव्हती आरोपी मुलगी.... असे सडले होते दोन्ही मृतदेह.... असे दुमजली घर होते श्रीहरी पुरुषोत्तम भाई आणि त्यांची पत्नी स्नेहा यांचे....
बातम्या आणखी आहेत...