अहमदाबाद/सुरत - संपूर्ण देशभरात आज मकरसंक्रांती अत्यंत जल्लोष आणि उत्साहात साजरी केली जात आहे. गुजरातमध्ये मकरसंक्रांतीला उत्तरायण पर्व साजरे केले जाते. मकरसंक्रांतीला असणारा पतंगबाजीचा उत्साहदेखिल गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो.
अबालवृद्ध तरुणांसह महिला आणि तरुणीही हा आनंद तेवढ्याच उत्साहाने साजरा करत असतात हे विशेष. यंदाही गुजरातमध्ये तरुणींची मोठी गर्दी पतंगबाजी करताना पाहायला मिळाली. तरुणींनी अगदी उत्हासाने पतंग उडवत आकाशात भरारी घेण्याचा हा अनोखा अनुभव घेतला.
थंडीतही मोठा उत्साह..
दरवर्षीच्या तुलनेत यंदा संपूर्ण देशातच थंडीचे प्रमाण अधिक आहे. तरीही पतंग उडवणाऱ्यांचा उत्साह जराही कमी झालेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. गच्चीवर पतंग उडवण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळते. एकमेकांचा पतंग कापण्यासाठी चाललेली स्पर्धा आणि त्याचा उत्साह हा नवीन वर्षातील पहिला सण असल्याचे दाखवून देत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पतंगबाजीतील गुजरातच्या तरुणींचा उत्साह...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)