गोध्रा - गोध्रा हत्याकांडामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी इरफानने नुकतेच एका पाकिस्तानी तरूणीशी विवाह केला आहे. गोध्रा हत्याकांडाच्या या आरोपीला आता कायमचे जामीन मिळाले आहे. इरफान एस. पाडा याला खालच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र हायकोर्टात अपील केल्यानंतर त्याच्या कायमच्या जामीनीच्या अर्जाला मंजूरी देण्यात आली आहे.
इरफानच्या लहानपणीच त्याचे वडील गेले. आई आणि दोन भावांसोबत इरफान गोध्रा धंत्या प्लॉटमधील एका घरात राहात होता. मागील वर्षी कराचीवरून आलेल्या मामासोबत एक मुलगी आली होती. मारीया चरखा नावाच्या या तरूणीशी इरफानची ओळख झाली. दोघांच्या कुटुंबियांनी होकार दिल्यानंतर इरफान आणि मारीयाचा विवाह झाला. मारीयाला भारतात राहाणे आवडते. मारीयालाही भारतासाठीचा कायमचा विझा मिळावा यासाठी इरफानचे कुटुंबिय प्रयत्न करत आहेत.