आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेध्रा जळीतकांडातील मुख्य आरोपी इम्रान बटूकला मालेगाव शहरातून अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद /मालेगाव- गुजरात राज्यात २००२ मध्ये घडलेल्या गाेध्रा जळीतकांडातील संशयित अाराेपी इमरान बटूक उर्फ शेरू अहमद बटूक (घांची) याला अहमदाबाद पाेलिसांनी मंगळवारी रात्री मालेगाव शहरातून अटक केली. गाेध्रा जळीतकांडात कारसेवकांच्या रेल्वे डब्यांना अाग लावण्यात अाली हाेती. या घटनेनंतर गुजरात राज्यात जातीय दंगली भडकल्या हाेत्या.
या जळीतकांडात इमरान बटूक याचा सहभाग निष्पन्न झाल्याने पाेलिस त्याच्या मागावर हाेते. त्याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. मात्र बटूक हा १४ वर्षापासून फरार हाेता. ताे मालेगाव शहरात वास्तव्यास असल्याची मिळाल्याने अहमदाबाद पाेलिसांचे पथक मंगळवारी रात्री मालेगाव शहरात दाखल झाले हाेते. बटूक वास्तव्यास असलेला भाग अाझादनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने मालेगाव पाेलिसांच्या मदतीने बटूकच्या मुसक्या अावळण्यात अाल्या. गुन्हे शाखेचे सहआयुक्त जे. के. भट्ट यांनी सांगितली की बटूक मालेगावात ट्रकवर वाळू भरण्याचे काम करत होता. तसेच त्याने महापौरांच्या कार्यालयातही काम केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. बटूक नंदूरबारलाही जाऊन आला होता. तसेच धुळे शहरात सहा वर्षे भाड्याच्या घरात राहून हॉटेलात नोकरी करत होता. त्याने धुळ्यातील अमीनाबानू नामक महिलेशी विवाह केला होता. त्यानंतर तो मालेगावला राहण्यास आला होता.
काही दिवस तो रिक्षा चालवत होता.
बातम्या आणखी आहेत...