आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gold Medalist Woman Officer Arrested To Taking Bribe In Rajkot News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारीला 20 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- गुजरातमधील अँटी करप्शन ब्यूरोने (एसीबी) एका गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारीला 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केले.एसीबीने राबवलेल्या मोहिमेत एका सहाय्यक आरटीओलाही ताब्यात घेण्यात आले आहे. महिला अधिकारी निधी कुबडिया (मोरबिया) असून ए.आर.राव असे दुसर्‍याचे नाव आहे.
गोल्ड मेडलिस्ट निधी कुबडिया ही गुजरात हाऊसिंग बोर्डची (जीएचबी) राजकोट येथे सहायक नगर नियोजक (क्लॉस-1) अधिकारी म्हणून कार्यरत आहे. निधीला एका प्लॉट विक्रेत्याकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केले. निधीने प्लॉट विक्रेत्याकडून 1.50 कोटी रुपयांची लाच मागितली होती. मात्र, त्यात तडजोड करून सौदा 85 लाखांत निश्चित झाला होता. 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याची निश्चित झाले होते.
दुसरीकडे, अहमदाबादचे सहायक आरटीओ राव यांच्या कारमधून 75 हजार रुपयांची रोकड एसीबीने जप्त केली आहे. राव यांच्याकडून 15 आणि कार चालकाकडून 60 हजार रुपये जप्त करण्‍यात आले. एसीबीचे अधिकारी चौकशी करत आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारीचे फोटो...