आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दलित नेत्याच्या तीन मुलींना ब्लॅकमेल करून 15 नराधमांनी केला गॅंगरेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनगर- गुजरातमधील एका दलित नेत्याच्या तीन मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर सामुहीक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिन्ही पीडित मुली सख्या बहिणी आहेत. 15 नराधमांनी त्यांना ब्लॅकमेल करून दोन वर्षे त्यांचे लैंगिक शोषण केले. तिन्ही पैकी एक पीडिता अल्पवयीन आहे. मि‍त्रांने आपली फसवणूक केली असून त्याच्यासह 15 जणांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणींनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणींच्या तक्रारीवरून 15 आरोपींविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत. तिन्ही बहिणींमधील सगळ्या मोठीच्या मित्राने तिचे लैंगिक शोषण केले. एवढे करूनही तो थांबला नाही. त्याने तिला ब्लॅकमेल करून त्याच्या 15 मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. समाजात बदनामी करू असेही पीडितेला धमकावले. एवढेच नव्हे तर पीडिलेला तिच्या दोन लहान बहिणींना ग्रुपमध्ये सहभागी करण्यास सांगितले. 15 नराधमांनी मागील दोन वर्षांत तिन्ही बहिणींवर आळीपाळीने अनेकदा बलात्कार केल्याचे एसएसपी दीपांकर त्रिवेदी यांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिस सखोल चौकशी करत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.