आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guj Govt To Seek Death Penalty For Maya Kodnani In Riot Case

कोडनानी, बजरंगीला फाशीच्‍या शिक्षेसाठी मोदी सरकार जाणार हायकोर्टात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2002 मध्ये नरोदा पाटीया येथे झालेल्या दंगलीतील दोषी माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह आठ जणांसाठी फाशीच्‍या शिक्षेची मागणी गुजरात सरकारतर्फे करण्‍यात येणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकार लवरकच उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन विशेष न्‍यायालयाच्‍या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहे.

कनिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्‍यासाठी 3 महिन्‍यांची मुदत असते. परंतु, याप्रकरणात न्‍यायालयाने 6 महिन्‍यांपूर्वी निर्णय दिला होता. त्‍यामुळे सरकारला सर्वप्रथम उच्‍च न्‍यायालयाची परवानगी घ्‍यावी लागणार आहे.

गुजरातमध्ये गोध्रा येथील घटनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या होत्या. त्‍यादरम्‍यान 28 फेब्रुवारी 2002 मध्ये नरोदा पाटीया येथे झालेल्या दंगलीत 97 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्‍टमध्‍ये माया कोडनानी, बाबू बजरंगी आणि अन्य आठ जणांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. यामध्ये कोडनानी यांना 28 वर्षांची, बजरंगी यांना जन्मठेपेची आणि अन्य आठ जणांना 31 वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी 22 आरोपींना 24 वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली होती. ती वाढवून 30 वर्षे करण्‍याचीही मागणी सरकारतर्फे करण्‍यात येणार आहे.

या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन अधिवक्‍त्यांची समिती बनविण्यात आली आहे. मोदी सरकारकडून पुढील आठवड्यात याचिका दाखल करण्यात येण्याची शक्‍यता आहे. कोडनानी या घटना घडली त्‍यावेळी मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या.