आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभेत मारहाण, मंत्र्यासह 3 आमदार जखमी, सभागृहातील दृश्य पाहून रक्तदाब वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून गुरुवारी गुजरात विधानसभेत मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. या मारहाणीत एका मंत्र्यासह दोन्ही पक्षांतील ३ आमदार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला मंत्री निर्मला वाधवाणी, बलदेव ठाकूर, परेश धानाणी आणि गौतम भाई (काँग्रेस) हे सदस्य जखमी झाले.
 
 प्रकरणात काँग्रेसच्या दोन सदस्यांना विधानसभा अध्यक्षांनी  अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे. सभागृहाचे कामकाज कसे चालते? हे पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही मारहाणीचा प्रकार पाहून धक्का बसला, तर भाजपचे आमदार अशोक  पटेल यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले.  
 
अमरेलीचे काँग्रेस आमदार परेश धानाणी यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला. ठरलेल्या वेळेपेक्षाही ते अधिक काळ बोलत हेाते. कृषिमंत्री यावर उत्तर देत असताना सभागृहात गोंधळास सुरुवात झाली . सभागृहात झालेल्या मारहाणीच्या प्रकाराची जबाबदारी सत्ताधारी व विरोधक दोघेही एकमेकांवर ढकलत होते.
बातम्या आणखी आहेत...