आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये 2 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 8 सभा; BJP करणार मन की बात-चाय के साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार 26 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 आणि 29 नोव्हेंबर रोजी गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसात ते 8 सभा घेणार आहेत. याशिवाय भाजपने 50 हजार पोलिंग बूथसाठी रणनिती बनवली आहे. भाजपने मन की बात-चाय के साथ अशी मोहीम राबविण्याचा निर्णयही घेतला आहे. पक्षाचे गुजरात प्रभारी भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

 

मोदींच्या सभा कुठे?
- पंतप्रधान मोदी हे 27 नोव्हेंबर रोजी कच्छ येथील भुज, राजकोट येथील जसदण, अमरेलीत धारी आणि सुरजमधील कामरेज येथे सभा घेतील. 
- 29 नोव्हेंबर रोजी मोदींची सभा सोमनाथमधील प्राची, भावनगर येथील पालिताणा आणि नवसारी येथे होईल. 

- पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यादव म्हणाले, मोदींच्या सभा अशा ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत जेथे आसपासच्या गावातून 6 जागांचे लोक पोहचू शकतात. 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...