आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्हणाले, अय्यर पाकमध्ये मला रस्त्यातून हटवण्याबाबत बोलले होते, त्याचा अर्थ काय होता?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी नरेंद्र मोदी शुक्रवारीही गुजरातमध्ये आहेत. शुक्रवारच्या चार सभांपैकी पहिल्या सभेचती सुरुवात मोदींनी बनासकांठामधून केली. यावेळी मोदी म्हणाले, काँग्रेस कधीही दुःखाच्या काळात गुजरातींबरोबर नव्हते. बनासकांठामध्ये पूर आला तेव्हा काँग्रेसचे लोक बेंगळुरूमध्ये स्विमिंग पूलमध्ये मज्जा करत होते. जे कठीण काळात कामी आले नाही, ते सख्खे असले तरी त्यांना माफ करता कामा नये. 


आणखी काय म्हणाले मोदी... 
- मोदी म्हणाले, जेवढ्या लांबपर्यंत पाहिले तेवढ्या लांबपर्यंत गर्दीच पाहायला मिळत आहे. त्यानंतर मोदींनी लोकांना झाडांवरून खाली उतरण्यासही सांगितले. 
- पाटण आणि बनासकांठाच्या लोकांना भाजप आणि काँग्रेसमध्ये असलेला फरक चांगलाच माहिती आहे. 
- जे निवडणुकांबाबत भविष्यवाणी करत आहेत, त्यांनी गर्दी पाहून घ्यावी. मोरबीमध्ये धरण फुटले तेव्हा इंदिरा गांधी तोंडावर रुमाल बांधून आल्या होत्या. 


वातावरण तापले...
- गुरुवारी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, मोदी नीच आहेत. 
- त्यावरून चांगलाच गदारोळ झाला. मी जातीने नीच असलो तरी माझ्यात संस्कार आहे. 
- त्यानंतर राहुल गांधींनी अय्यर यांना माफी मागण्यास सांगितले. त्यांचे काँग्रेसमधून निलंबनही करण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...