Home | National | Gujarat | Gujarat Assembly Election Poster Seen In Surat Congress Ahmed Patel

‘अहमद पटेलांना मुख्यमंत्री बनवा’ गुजरातमध्ये झळकले पोस्टर; हे भाजपाचे कृत्य- काँग्रेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2017, 08:47 AM IST

अहमद पटेल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आहेत. पटेल गुजरातमधून राज्यसभेचे खासदारही आहेत.

 • Gujarat Assembly Election Poster Seen In Surat Congress Ahmed Patel

  सुरत- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वी सुरतमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मुख्यमंत्री बनवण्याची विनंती करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टर्समध्ये लिहिले आहे, मुस्लिमांनी एकत्र येऊन काँग्रेसला पाठिंबा द्यावा, म्हणजे अहमद पटेल यांना मुख्यमंत्री बनवणे शक्य होईल. पटेल यांनी मात्र हा भाजपचा कट असल्याचा आरोप केला आहे. आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतच नाही, असेही अहमद पटेल यांनी स्पष्ट केले.


  पटेल यांना बनवा ‘वजीर-ए-आलम’
  अहमद पटेल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आहेत. गुरुवारी व्यापाऱ्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरतमध्ये काही त्यांच्या नावाने पोस्टर्स झळकले. त्यात अहमद पटेलांबरोबर राहुल गांधीही झळकत आहेत. पोस्टरमध्ये गुजराती भाषेमध्ये लिहिले आहे, मुस्लिमांनी एकत्र येऊन काँग्रेसला पाठिंबा द्यावा, म्हणजे अहमद पटेल यांना ‘वजीर-ए-आलम’ म्हणजे मुख्यमंत्री बनवता येऊ शकेल.’


  पटेल म्हणाले, मला CM बनायचेच नाही
  - या पोस्टर्सबाबत अहमद पटेल यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, हे भाजपने पसरवलेले आहे. हा कट असल्याचे ते म्हणाले. पटेल म्हणाले, भाजपला समजले आहे की, त्यांचा पराभन होणार आहे. यामुळे अशा बाबी पसरवल्या जात आहेत.
  - पटेल म्हणाले, मी कधीच CM कँडिडेट नव्हतो आणि असणारही नाही.

 • Gujarat Assembly Election Poster Seen In Surat Congress Ahmed Patel
 • Gujarat Assembly Election Poster Seen In Surat Congress Ahmed Patel

Trending