अहमदाबाद (गुजरात)- अहमदाबाद गुन्हे शाखा आणि एटीएसच्या पथकाने शहरातील एका फॅक्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या ड्रगजी बाजारातील किंमत सुमारे 270 कोटी रूपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अहमदाबाद भाजपाचे माजी आमदार भावसिंह राठोड यांचा मुलगा किशोर राठोडचे नाव समोर आले आहे.
- पोलिसांना माहिती मिळाली की, किशोर व त्याच्या मित्रांनी अमली पदार्थ लपवले आहेत.
- मागील पंधरा दिवसांपासून येथे अमली पदार्थ तयार करण्यात येत होते.
- एटीएस व गुन्हे शाखेचे अधिकारी बारकाईने हालचालींवर नजर ठेऊन होते.
- एटीएसच्या तपासात समोर आले की, फॅक्ट्रीच्या शेडमध्ये या ड्रग्जवर रासायनिक प्रक्रिया करून पार्टी ड्रग्ज तयार करण्यात येत होती.
- रासायनिक प्रक्रिया करणा-या नरेंद्रभाई काचा याला पोलिसांनी अटक केली आहे.
- नरेंद्र काचा हा बीएससी केमेस्ट्रीपर्यंत शिकला आहे. या क्षेत्रात त्याला 20 वर्षांचा अनुभव आहे.
- नरेंद्र काचाची चौकशी केल्यानंतर कळले की, किशोर आणि त्याचा मित्र जयने महाराष्ट्रातील सोलापूर येथील पुनित नावाच्या एका व्यक्तीच्या फार्मास्युटिकल फॅक्ट्रीतून मागितली होती. या ड्रग्जला केमिकल प्रोसेसद्वारे मेथाफेटामाइनमध्ये बदलले जाते.
- क्लब व रेव्ह पार्टीमध्ये या ड्रग्जला मोठी मागणी आहे.
दुबईच्या पोलंडमधील ड्रग्ज तस्करासोबत किशोरचा संबंध....
- एटीएसच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, किशोर त्याच्या जय नावाच्या एका मित्रासोबत नुकताच दुबईला गेला होता.
- दुबईत राहणा-या एका गुजरातीने पोलंडच्या ड्रग्स तस्करासोबत किशोरची भेट करून दिली.
- दोघांमध्ये झालेल्या चर्चेत ठरले की, पार्टी ड्रग्ज तयार करून भारतात पुरवठा करायचा.
किशोर राठोड फरार.....
- याआधी किशोरला 2000 मध्ये बनावट नोटा प्रकरणात अटक झाली होती.
- किशोरला अटक केरण्यासाठी एटीएसने कित्येक ठिकाणी छापेमारी केली होती.
- मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. तो फरार असल्याची माहिती आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोण आहे आरोपी किशोरचे वडील भावसिंह राठोड....