आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात: पोटनिवडणुकीत BJP च्या विजयानंतर मोदींचे Tweet- सर्व राज्यात चांगली कामगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात निवडणुकीत भाजपच्या विजयावर मोदींनी जनतेला धन्यवाद दिले. - Divya Marathi
गुजरात निवडणुकीत भाजपच्या विजयावर मोदींनी जनतेला धन्यवाद दिले.
अहमदाबाद - नोटबंदी निर्णयानंतर झालेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुजरात पोटनिवडणुकीच्या निकालातही भाजपने बाजी मारली आहे. मंगळवार दुपारपर्यंत पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपने २३ आणि काँग्रेसने ८ जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन जनतेला धन्यवाद दिले आहेत. नोटबंदीनंतरची ही निवडणूक असल्यामुळे एक प्रकारे मोदींच्या निर्णयावर जनतेने समर्थन केल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येणार असल्याची माहिती आहे.
- सूरतमधील कनकपूर-कांसद नगरपालिकेतील एकूण २८ पैकी २७ जागांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. येथे काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली.
- वापी नगरपालिकेच्या ४४ पैकी ४१ जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले तर ३ ठिकाणी काँग्रेस निवडून आली.
ट्विटमध्ये काय म्हणाले मोदी
- पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन जनतेला धन्यवाद म्हटले. ते म्हणाले, 'गुजरात नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपवर पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांना धन्यवाद. मुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन.'
- 'पूर्वोत्तर, बंगाल, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि आता गुजरातमध्येही भाजपने चांगली कामगिरी केली आहे. यातून सिद्ध होते की लोक विकासासोबत आणि भ्रष्टाचाराच्याविरोधात आहेत.'
मोदी मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी येणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येण्याची शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी मोदी सभा घेणार असल्याचे वृत्त आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींचे ट्विट..
बातम्या आणखी आहेत...