आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात; शहरातील शाळेला गावाचा लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालनपूर - हे छायाचित्र गुजरातमधील श्रीराम विद्यालयाचे आहे. नाव आहे श्रीराम विद्यालय सत्यम बाल मंदिर. या शाळेत सहा कुट्या बनवल्या असून प्रत्येक झोपडीत २५ विद्यार्थी बसू शकतात. पहिली-दुसरीचे वर्ग इथेच भरतात. पण त्यात शाळेतील सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. गुजरातमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे.

या नवोन्मेषामागील कहाणी... शाळेशी संबंधित सुरेशभाईंनी सांगितले की, ‘आम्ही एकदा कुटुंबीयांसोबत पाकिस्तान सीमा पाहण्यास गेलो होतो. परतताना रस्त्यात बखासर गाव पाहिले. तेथील लोक अशाच कुटीत राहत होते.ते पाहून मुले आश्चर्यचकित झाली. त्यांनी असे घर कधी पाहिलेच नव्हते. शहरातील मुलांना गावांतील जीवनाचा अनुभव यावा म्हणून शाळेतच असे वर्ग तयार करावेत, अशी कल्पना आमच्या मनात आली.
पुढे पाहा... संबंधित छायाचित्रे...