आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे गुजरातच्या मुख्‍यमंत्र्यांची नात, लंडनमधील फोटोशूट झाले व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातच्या मुख्‍यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नात संस्कृती - Divya Marathi
गुजरातच्या मुख्‍यमंत्री आनंदीबेन पटेल यांची नात संस्कृती
अहमदाबाद - गुजरातच्या मुख्‍यमंत्री आनंदीबेन पटेल राजनामा देणार आहेत. त्यांनी याविषयी माहिती आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर दिली आहे. आनंदीबेन यांनी एफबी पोस्टमध्‍ये लिहिले आहे, की आता मी 75 वर्षांची होणार आहे. यामुळे मी पक्षाच्या वरिष्‍ठ नेत्यांना विनंती करते, की मला पदमुक्त करण्‍यात यावे. येत्या 24 नोव्हेंबर रोजी 75 वर्षांच्या होत असलेल्या आनंदीबेन यांनी मे 2014 मध्‍ये गुजरातच्या पहिल्या महिला मुख्‍यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या कुटुंबात पती, मुलगी अनारा व जावई जयेश असे सदस्य आहेत. अनारा व जयेश यांना संस्कृती नावाची मुलगी आहे. ती सध्‍या लंडनमध्‍ये शिकत आहे. आपल्या फोटोशूटमुळे संस्कृती नुकतेच चर्चेत आली होती...
संस्कृतीने नुकतेच आपले फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. ती लंडनच्या कॉलेज ऑफ फॅशनमध्‍ये शिकत आहे. तिने अहमदाबादमध्‍ये 'सांस' नावाचे मल्टी डिझाइनर स्टुडिओही सुरु केला आहे. संस्कृतीने शेअर केलेले सर्व छायाचित्रांना पसंती मिळत आहे. इतके नव्हेतर काही मित्रांनी तिला बॉलीवूडमध्‍ये केव्हा येते, असे विचारले आहे. याला प्रत्युत्तर देताना संस्कृती म्हणाली, सिल्व्हर स्क्रीनवर केव्हा येईल हे सांगता येणार नाही, मात्र कोणत्याना कोणत्या स्क्रीनवर नक्की येणार.
लंडनच्या छायाचित्रकाराला दिले क्रेडिट
नुकतेच संस्कृतीने फेसबुकवर आपले ताजे छायाचित्रे पोस्ट केले आहे. यात तिने फोटोशूट करण्‍यासाठी लंडनचा छायाचित्रकार मेऊरिग मार्शल व मेकअप आर्टिस्ट सुझान स्मिथ यांना क्रेडिट दिले आहे. या दोघांबरोबर काम करायला मजा आली असल्याचे तिने लिहिले आहे.
केव्हा येणार लंडनमधून
संस्कृती सप्टेंबर 2014 मध्‍ये लंडनमध्‍ये आली होती. त्यावेळी तिने फेसबुकवर लिहिले होते, की लंडनला जात आहे. तीन वर्षानंतर गुजरातला परतणार आहे. तिच्या फेसबुकवर बरेच छायाचित्रे फोटोशूटचे आहेत. एका छायाचित्रात ती आपले आईवडिलांसोबत दिसत आहे. या छायाचित्राखाली तिने लिहिले, स्वर्ग निश्चित छोटा असेल, कारण मी ते तुमच्या डोळ्यात पाहत आहे. देवानंतर आईवडील. एका दुस-या फोटोत तिने लिहिले आहे, की Jayesh+Anar = JAYANA♥♥ = Life♥.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संस्कृतीचे फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...