आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK ने केली होती भारताच्या या CM ची हत्या, विमानावर फायर केल्या होत्या 2 मिसाईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान)-  भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान झालेल्या 1965 च्या युद्धात पहिल्यांदाच एका नागरी विमानाला लक्ष्य करण्यात आले होते. गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांच्या विमानावर पाकिस्तानकडून दोन मिसाईल फायर करण्यात आल्या होत्या. युद्धात ठार झालेले ते पहिले भारतीय राजकीय व्यक्ती आहेत. मेहता यांच्या विमानावर भुजजवळ पाकिस्तानच्या सेबर लढाऊ विमानाने मिसाईल फायर केल्या होत्या. यात मेहता यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला होता.
 
अशी घडली होती घटना
- 19 सप्टेंबर 1965 रोजी दुपारी दोनच्या सुमारास बलवंतराय मेहता अहमदाबादपासून चारशे किलोमीटर दूर अंतरावर एका सभेला संबोधित करण्यासाठी विमानाने जात होते.
- इंडियन एअरफोर्सचे माजी वैमानिक जहांगीर जंगू इंजिनिअर हे विमान उडवत होते. या विमानात मेहता यांची पत्नीही होती.
 
पाकिस्तानी वैमानिकाने सांगितले असे
- पाकिस्तानच्या मौरीपूर एअरबेसवर तैनात फ्लाईंग ऑफिसर कॅस हुसैन यांना सांगण्यात आले, की भुजजवळ उडत असलेल्या एका विमानाची हवाई तपासणी करा. माहिती मिळाल्यानंतर लगेच हुसैन यांनी विमानातून उड्डाण केले.
- भारतीय सीमेत पोहोचल्यावर हुसैन यांच्या लक्षात आले, की हे नागरी विमान आहे. लष्करी नाही. त्यांनी त्यावर फायरिंग केले नाही.
- मला विमानावर लिहिलेली अक्षरे स्पष्ट दिसत होती. मी कंट्रोल रुमला याची माहिती दिली. मला काही क्षण थांबण्यास सांगितले. त्यानंतर विमानाला उडवून देण्याचा आदेश मिळाला.
- मी विमानावर दोन मिसाईल फायर केल्या. विमानाला आग लागली. जळते विमान जमिनीवर कोसळले.
 
46 वर्षे मनात राहिली सल
- युद्ध संपल्यानंतर घडलेली घटना काळाच्या पडद्याआड गेली. पण हुसैन मात्र ही घटना विसरू शकले नाहीत. एक नागरी विमानावर क्षेपणास्त्र फायर केल्याची सल त्यांना बोचत होती.
- 2011 मध्ये या घटनेशी संबंधित एक रिपोर्ट प्रकाशित झाला. त्यानंतर हुसैन यांच्या स्मृती ताज्या झाल्या.
- या घटनेत ठार झालेल्या वैमानिकाचा शोध घेण्यास हुसैैन यांनी सुरवात केली. तेव्हा त्यांना जंगू इंजिनिअरची मुलगी हरीदासिंग हिची माहिती मिळाली.
- त्यानंतर हुसैन यांनी फरीदाशी संपर्क साधला. त्या दिवशी काय घडले होते हे सविस्तर सांगितले. तिच्या वडीलांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले.
 
मुलीने केले माफ
- हुसैन यांनी हरीदासिंग यांना पत्र लिहिले होते. त्यांनी त्यात म्हटले होते, की अधिकाऱ्यांचा आदेश पाळण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता.
- त्याला उत्तर देताना हरीदासिंग यांनी सांगितले, की युद्धाच्या खेळात आम्ही सर्व केवळ सोंगट्या असतो. आता तुम्हाला समाधान लाभेल अशी आशा करते.
 
पुढील स्लाईडवर बघा इतर फोटो....
बातम्या आणखी आहेत...