आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Congress Declares Living Nelson Mandela Dead, Regrets Later

गुजरात कॉंग्रेसने नेल्‍सन मंडेला यांना जिंवतपणीच ठार मारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष नेल्‍सन मंडेला हे सध्‍या रूग्‍णालयात मृत्‍यूशी झुंज देत आहेत. त्‍यांच्‍या आरोग्‍यासाठी देशभरातून प्रार्थना करण्‍यात येत असताना गुजरात कॉंग्रेसने मात्र त्‍यांना जिंवतपणीच ठार मारले आहे.

गुजरात कॉंग्रेसने बुधवारी एक निवेदन जारी केले असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी मंडेला यांच्‍या निधनावर शोक व्‍यक्‍त केला आहे. इंटरनेटवर मंडेला यांच्‍या निधनाची अफवा उडाली होती. मात्र, दक्षिण आफ्रिका सरकारने अधिकृतरित्‍या कोणतीही घोषणा केलेली नसतानाही गुजरात कॉंग्रेसचे नेते अर्जुन मोडवाडिया आणि शंकरसिंह वाघेला यांनी मंडेला यांच्‍या निधनावर दु:ख व्‍यक्‍त केले. मात्र, काही वेळानंतर पक्षाला जेव्‍हा आपली चूक लक्षात आली तेव्‍हा त्‍यांनी एक खेद व्‍यक्‍त करणारे पत्रक जारी केले.