आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने 24 तासांपूर्वीच मला पक्षातून बाहेर केले- शंकरसिंह वाघेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघेला शुक्रवारी त्यांचा 77वा वाढदिवस साजरा करत आहेत. - Divya Marathi
वाघेला शुक्रवारी त्यांचा 77वा वाढदिवस साजरा करत आहेत.
गांधीनगर - काँग्रेसचे गुजरातमधील मातब्बर नेते शंकर सिंह वाघेला यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. यानिमित्ताने आयोजित संवेदना संमेलनात ते म्हणाले, 'राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मला सार्वजनिक आयुष्य कसे जगायचे ते शिकवले. काँग्रेसने तर 24 तासांपूर्वीच मला बाहेर केले आहे. त्यांचा आरोप आहे की शंकरसिंह वाघेलाने राष्ट्रपती निवडणूकीत गुजारतमध्ये क्रॉस वोटिंग करायला लावले.' काँग्रेसने त्यांच्या कार्यकर्त्यांना या संमेलनापासून दूर राहाण्यास सांगितले आहे. या प्रश्नावर वाघेला म्हणाले,'यात मी काय सांगणार? ज्यांना यायचे असेल ते येतील. कार्यकर्त्यांनी कोणत्या कार्यक्रमाला जायचे कोणत्या नाही, हे सांगण्याचा पक्षाला (काँग्रेस) पूर्ण अधिकार आहे. कार्यकर्त्यांनाही त्यांनी काय करायचे हे ठरविण्याचा अधिकार आहे.' विशेष म्हणजे या वर्षाच्या शेवटी राज्यात विधानसभा निवडणूक आहे. 
 
आणखी काय म्हणाले वाघेला 
- वाघेला म्हणाले, 'माझ्या सार्वजनिक आयुष्याला 1964 मध्ये सुरुवात झाली. अजूनही मी काँग्रेसमध्ये आहे. मात्र त्यांची विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. मी सामान्य माणसाच्या शोधात आहे. तुम्ही आमच्यासाठी नाही तर आम्ही तुमच्यासाठी आहोत.'
- वाईट अनुभवही पचवण्याची ताकद असल्याचे सांगताना वाघेला यांनी आपल्या नावाबद्दलचा किस्सा सांगतीला. ते म्हणाले,'आमच्या गावात भगवान शंकराचे मंदिर होते. त्यामुळे घरच्यांनी माझे नावही शंकर ठेवले. शंकराकडून मी विषाचे घोट पिण्याची कला शिकलो आहे. मी आता 77 नॉट आऊट आहे. माझ्याजवळ जो येईल त्याला उभं करु शकतो, पडू तर नक्कीच देणार नाही.'
- 'मला पक्षाशी देणेघेणे नाही. स्वतःसाठीही काही नको. मला जनतेचे भले झालेले पाहायचे आहे. पब्लिकचे भले झाले पाहिजे, पक्षाच्या हिताची मला चिंता नाही. माझी लढाई ही अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई आहे. आत्मसन्मानासोबत मी तडजोड करणार नाही.' 
- 'सरकार स्थापन करण्यासाठी होमवर्कची गरज आहे. सरकारचे काम हे जनते साठी असले पाहिजे.'
 
कोण आहेत वाघेला ? 
 - 1940 मध्ये जन्मलेले वाघेला यांनी राजकीय आयुष्याची सुरुवात जनसंघापासून केली होती. त्यानंतर त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. नंतर भारतीय जनता पक्षात ते काम करु लागले.
 - 1996 मध्ये वाघेलांनी भाजपला रामराम ठोकून स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. राष्ट्रीय जनता पार्टी. 
 - 1996-97 ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. नंतर राष्ट्रीय जनता पार्टीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले. 
 - वाघेला पाच वेळा लोकसभा सदस्य आणि 1984 ते 89 राज्यसभा सदस्य होते. 
 - 2004-09 या यूपीए-2च्या काळात ते केंद्रात वस्त्रोद्योग मंत्री होते. सध्या ते गुजरातमधील कापडवंज येथील आमदार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...