आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Couple Given Birth To 14 Girls Now Got Son

14 मुलीनंतर झाला मुलगा, दांपत्य म्हणाले- एक आणखी होऊ द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 मुलींसह रामसिंह संगोड आणि डावीकडून दुसऱ्या कनुबेन. - Divya Marathi
14 मुलींसह रामसिंह संगोड आणि डावीकडून दुसऱ्या कनुबेन.
दाहोद (गुजरात)- ‘हम दो-हमारे दो’ हे सुखी कुटुंबाचे सूत्र आहे. पण एका कुटुंबासाठी केवळ मुलगा होण्यात सुख असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. मुलगा व्हावा यासाठी एका दांपत्याने तब्बल 14 मुलींना जन्म दिला. आता मुलगा झाल्याने त्यांची प्रतिक्षा संपली असे लोकांना वाटले. पण अजूनही हे दांपत्य म्हणतेय की आणखी एक होऊ द्या.
यासाठी हवाय आणखी एक मुलगा
या दांपत्यातील पुरुषाचे नाव रामसिंह संगोड असून महिलेचे नाव कनुबेन असे आहे. 20 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना 14 मुली आहेत. आता त्यांना एक मुलगाही झालाय. पण मुलगा होण्यापूर्वी त्यांना आणखी दोन मुली झाल्या होत्या. त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर हा मुलगा झाला असल्याने त्याचाही मृत्यू होण्याची भीती या दांपत्याला वाटत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एक मुलगा व्हावा अशी भूमिका घेतली आहे. सध्या कनुबेन गर्भवती असून आणखी एका आपत्याला जन्म देणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, रामसिंह संगोड आणि कनुबेन यांचे फोटो....