आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात: परेश रावल रजवाड्यांना म्हणाले माकड; भाजप आमदारच म्हणाल्या- कमळाला मत देणे पाप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - गुजरात निवडणुकीत प्रचारादरम्यान नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा फैरी सुरूच आहेत. नेत्यांची जीभही अनेक वेळा घसरलेली पाहण्यात आले आहे. अशीच काही वक्तव्ये भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी केली आहेत. भाजप खासदार आणि अभिनेता परेश रावल यांनी राजघराण्यांची तुलना माकडाशी केली. यामुळे ते वादात सापडले आहेत. दुसरेकडे पक्षाच्या एका आमदाराने म्हटले की, कमळाला मत दिल्याने पाप लागेल.


काय म्हटले होते परेश रावल यांनी...
- परेश यांनी शनिवारी रात्री भाजप निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान म्हटले होते की, सरदार पटेल यांनी देश एक करण्यासाठी माकडांसारख्या राजघराण्यांना एक केले होते.
- त्याच्या या वक्तव्यानंतर पद्मावती चित्रपटाला विरोध करणाऱ्या राजपूत करणी सेनेने त्यांचा पुतळा जाळण्याची घोषणा केली होती.

 

गोंधळ माजल्यावर दिले स्पष्टीकरण
- करणी सेनेच्या या घोषणेनंतर परेश यांनी पत्रकार परिषद बोलावून स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, राजपूत देशासाठी गौरव आहेत आणि त्यांच्याबाबत मी असे वक्तव्य करू शकत नाही.
- परेश यांनी म्हटले की, त्यांनी राजपूतांबाबत नाही, तर माकडासारख्या उड्या मारून पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्या हैदराबादचा निझामला टारगेट करून असे वक्तव्य केले होते. तरीही जर माझ्या या वक्तव्याने राजपूत समाजाच्या भावनांना धक्का पोहोचला असेल तर मी यासाठी माफी मागतो.

 

कमळाला मत दिले तर पाप लागेल
- केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरेंद्र नगरमध्ये भाजप उमेदवारांच्या सपोर्टमध्ये सभा घेण्यात आली होती. यात वढवाण मतदारसंघातील सध्याच्या आमदार वर्षाबेन दोशी यांची जीभ घसरली. त्या म्हणाल्या की, कमळाला मत दिले तर पाप लागेल. हे ऐकून सभेला जमलेल्या लोकांमध्ये हशा पिकला.

 

वेडी बाभळ या देशाची पैदावार नाही
- सुरेंद्र नगरमध्येच भाजप खासदार पुरुषोत्तम रूपाला याची जीभ घसरली.
- त्यांनी येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना म्हटले की, परदेशातून भारतात रुजवण्यात आलेली वेडी  (जंगली) बाभळ या देशाची पैदावार नाही. जेथे जाल तेथे वाट अडवणाऱ्या या बाभळली (वेडी) देशाची सत्ता सोपवता येऊ शकत नाही.
- रूपाला यांनी सोनिया गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. म्हणाले की, काँग्रेसी मिजास असणाऱ्या या बाभळीला जेवढे कापाल तेवढीच मोठी होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...