आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातचे रण : गांधीजींच्या घरापासूनच राहुल यांचा दौरा सुरू, पाटीदारांच्या बालेकिल्ल्यात सभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - राहुल गांधी शुक्रवारी गुजरातच्या पोरबंदरला पोहोचले. दोन दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी 10 सभा घेणार आहेत. तसेच राहुल गांधी शक्ती केंद्रातही जाणार आहेत. यावेळी राहुल गांधींना देशातील सर्वात मोठ्या आकाराचा राष्ट्रध्वज सोपवला जाणार आहे. हा तिरंगा 125 फूट रुंद आणि 83. फूट उंच आहे. शक्ती केंद्राच्या मते राहुल गांधी देशाला, उच्च नीच या वादातून कायमचे मुक्त करण्याचे आश्वासन देतील. गुजरातमध्ये 7% दलित मतदार आहेत. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर निकाल 18 तारखेला येतील. 


गुजरातमध्ये अनेक मुद्दे... 
- राहुल गांधींनी गुजरात दौऱ्याच्या सुरुवातीला पोरबंदरमध्ये महात्मा गांधींच्या घरून यात्रेला सुरुवात केली. ते म्हणाले, अमित शहांच्या मुलाने भरपूर पैसा कमावला आहे. कंपनीला 50 हजार कोटींवरून 80 हजार कोटींपर्यंत पोहोचवले. 
- गुजरातमध्ये जीएसटी, नोटबंदी, भ्रष्टाचार. महागाई, बेरोजगारी असे अनेक मुद्दे उचलणार असल्याचेही ते म्हणाले. 
- राहुल पाटीदारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या निकोलमध्येही एक सभा घेणार आहेत. 


राहुल यांच्या सभा 
24 नोव्हेंबर : पोरबंदर, साणंद 
25 नोव्हेंबर : दहेगाम, बायड, दाहोद, लुणावाडा, संतरामपूर


27 पासून मोदींचा प्रचार.. 
- गुजरातमध्ये भाजपला विजय मिळवून देण्यासाठी मोटी 278 नोव्हेंबरपासून प्रचाराची कमान सांभाळणार आहेत. मोदी दोन दिवसांत गुजरातमध्ये 8 रॅली करणार आहेत. 27 आणि 29 नोव्हेंबरला या रॅली होतील. 
- त्याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यदेखिल प्रचारात उतरणार असल्याचे दिसत आहे. भाजपने याबाबत औपचारिक घोषणाही केली आहे. 
- भाजप 50 मंत्र्यांच्या ताफ्यासह प्रचारात उतरणार आहे. सर्व केंद्रीय मंत्री आणि काही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही गुजरातमध्ये 26 आणि 27 नोव्हेंबरला निवडणुकीचा प्रचार करतील. 
- त्यात प्रामुख्याने राजनाथ सिंह, नितिन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, स्मृति ईरानी, धर्मेंद्र प्रधान आणि पीयूष गोयल यांचा समावेश आहे. 
- मुख्यमंत्र्यांमध्ये, योगी आदित्यनाथ, वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान, देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. दुसरीकडे अणित शाह सर्व स्टार प्रचारकांसह 26 नोव्हेंबरला 89 विधानसभा मतदारसंघात सभा घेतील. 

 

बातम्या आणखी आहेत...