आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात काँग्रेसमध्‍ये तिकीट वाटपावरून घमासान, हायकमांड टीम पाठवून करणार डॅमेज कंट्रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर तिकीट वाटपावरुन नेत्‍यांमध्‍ये नाराजी उफाळून आल्‍याने पार्टी हायकमांड त्रस्‍त झाल्‍याची माहिती आहे. - Divya Marathi
ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर तिकीट वाटपावरुन नेत्‍यांमध्‍ये नाराजी उफाळून आल्‍याने पार्टी हायकमांड त्रस्‍त झाल्‍याची माहिती आहे.
अहमदाबाद- गुजरात काँग्रेसमध्‍ये तिकीट वाटपावरुन सध्‍या जोरदार घमासान सूरू आहे. यामुळे पार्टी हायकंमाड त्रस्‍त झाले असून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने गुजरातमध्‍ये आपली टीम पाठवण्‍याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्‍ये काँग्रेसमधील मोठ्या नेत्‍यांचा समावेश असण्‍याची शक्‍यता आहे, ते तिकिट न मिळाल्‍यामूळे नाराज झालेल्‍या कार्यकर्त्‍यांची आणि नेत्‍यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत. 


तिकीट वाटपाचा काँग्रेसला धक्‍का
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्‍ये सुरतची जागा ही काँग्रेसला अनुकुल मानली जात आहे. मात्र तिकीट वाटपामुळे नाराज होऊन येथील 3 महत्‍त्वाच्‍या नेत्‍यांनी ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर पक्षाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस पक्ष नेतृत्‍वामध्ये चिंतेचे वातावरण असल्‍याची माहिती आहे.

 

काय असणार पक्षाची रणनिती?
- एका वृत्‍तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनूसार काँग्रेसच्‍या एका वरिष्‍ठ नेत्‍याने तिकीट वाटपावरुन गुजरातमधील काँग्रेस कार्यकर्त्‍यांमध्‍ये आणि काही नेत्‍यांमध्‍ये नाराजी असल्‍याचे मान्‍य केले आहे. पक्षासाठी प्रत्‍येक कार्यकर्ता महत्‍त्‍वाचा असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे.
- व्‍यावसायिकांचे प्रमुख क्षेत्र म्‍हणून ओळखले जाणारे सुरत हे काँग्रेससाठी अत्‍यंत महत्‍त्‍वाची जागा आहे. आणि येथेच पक्षाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील 3 प्रमुख नेत्‍यांनी काँग्रेसपक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
- त्‍यामुळेच थेट पक्षनेतृत्‍वानेच सुरतमधील नाराजीनाट्यामध्‍ये लक्ष घातले आहे. याअंतर्गत एक टीम लवकरच सुरतमध्‍ये येणार असून कार्यकर्त्‍यांची आणि नेत्‍यांची नाराजी दुर करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. या टीमला फायरींग टीम असे म्‍हटले जात आहे. 

 

मुस्लिम नेतेही नाराज 

- काँग्रेसवर गुजरातमधील मुस्लिम नेतेही नाराज असल्‍याची माहिती आहे. गुजरात काँग्रेसचे सचिव फिरोज मलिक यांनी म्‍हटले आहे की, 'आम्‍हाला इतरांच्‍या बरोबरीने तिकिटे देण्‍यात येतील असे आश्‍वासन पक्षाने दिले होते. ते त्‍यांनी पाळले नाही.' 

 

उत्‍तर भारतीयांना तिकीट का दिले नाही?
- धनसुख राजपूत हे काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. त्‍यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्‍यांचे म्‍हणणे आहे की, गुजरामध्‍ये जवळपास 15 लाख उत्‍तर भारतीय आहेत. मात्र काँग्रेसने त्‍यांच्‍या एकाही नेत्‍याला तिकीट दिले नाही.' 

- पाटीदार समाजाच्‍या नेत्‍यांना काँग्रेसतर्फे तिकीट वाटप करण्‍यात आले आहे. मात्र हार्दीक पटेलने म्‍हटले आहे की, 'आम्‍ही तिकीटाची कोणतीही मागणी केली नव्‍हती.' 
- 9 आणि 14 डिसेंबररोजी गुजरामध्‍ये निवडणुका होणार असून 18 डिसेंबररोजी निकाल लागणार आहे. 

 

सुरतमध्‍ये काँग्रेसला का आहे आशा? 

- सुरतला कापड व्‍यापा-यांचे गड समजले जाते. येथे मोठ्या प्रमाणात पाटीदार आणि राजपूत समाज आहे. जीएसटीविरोधात येथील व्‍यापा-यांमध्‍ये नाराजी आहे. या नाराजीलाच कॅश करण्‍याचा प्रयत्‍न काँग्रेस या निवडणुकीत करणार आहे. 
- गुजरात विधानसभा निवडणुकीमध्‍ये सुरत किती महत्‍त्‍वाची जागा आहे याचा अंदाज यावरुनच बांधता येईल की, काही दिवसांपूर्वी अमित शहा येथे 2 दिवस तळ ठोकून होते. यादरम्‍यान त्‍यांनी येथील व्‍यापा-यांशी आणि दुकानदारांशी चर्चा केली. व्‍यवसायातील अडचणी दुर करण्‍याचे आश्‍वासन अमित शहा यांनी यावेळी दिले होते.   
 

 

बातम्या आणखी आहेत...