आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव यांना गुजरात पाेलिसांची मारहाण; गुजरात पाेलिस भाजपच्या तालावर नाचतात- सातव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकाेट/ हिंगाेली- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मतदारसंघ असलेल्या राजकोटमध्ये प्रचाराचे  पाेस्टर लावण्याच्या कारणावरून काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरू, महाराष्ट्रातील खासदार व साैराष्ट्रमधील काँग्रेसचे निवडणूक प्रभारी खासदार राजीव सातव यांना पाेलिसांनी मारहाण केल्याचा अाराेप काँग्रेसकडून केला जात अाहे. या मारहाणीचे सातव यांचा मतदारसंघ असलेल्या हिंगाेलीतही पडसाद उमटले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात हिंसक अांदाेलक करून बसवर दगडफेक केली, तसेच अाैंढा नागनाथ येथील भाजपचे कार्यालय फाेडले.

 

तर या अांदाेलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी कळमनुरीत सातव यांचे कार्यालय फाेडून राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन केले.  गुजरात निवडणुकीत रूपाणी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार इंद्रनील राजगुरू, त्यांचे भाऊ दीपराज व इतर कार्यकर्त्यांना पाेस्टर लावण्याच्या कारणावरून पाेलिसांनी शनिवारी रात्री मारहाण केली. त्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्याद घेण्यात अाली नाही. त्यामुळे निवडणूक प्रभारी असलेले खासदार सातव व इतर स्थानिक नेत्यांनी रात्री दहा वाजता पाेलिस ठाण्यात जाऊन धरणे अांदाेलन केले. मात्र तेथील पाेलिसांनी सातव यांच्यासह इतर अांदाेलकांना पाेलिस ठाण्यात नेऊन मारहाण केली, असा अाराेप सातव व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच अांदाेलकांना अटक करून नंतर साेडून देण्यात अाले.

 

गुजरात पाेलिस भाजपच्या तालावर नाचतात : सातव  
पोलिस अधिकारी भाजपच्या तालावर नाचतात. त्यांच्यामुळेच गुजरात पोलिस बदनाम आहेत. या पाेलिसांनी अाम्हाला, अामच्या उमेदवाराला मारहाण केली. भाजपच्या सांगण्यावरून हे घडले. गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे काँग्रेस, उमेदवार, काँग्रेसच्या प्रचारकांना लक्ष्य केले जात असल्याचे सातव म्हणाले. 

 

हे ही वाचा, औंढ्यात मोदींचा पुतळा जाळला, भाजप कार्यालय फोडले; राजकोटमध्ये खा. सातवांना मारहाण ...

बातम्या आणखी आहेत...