Home »National »Gujarat» Gujarat Election Rahul Gandhi On Social Media Tweets Popularity Pidi

सोशल मीडियावरील वाढत्‍या लोकप्रियतेबाबत राहुल म्‍हणाले; मी सल्‍ला देतो, PIDI ट्विट करते

दिव्‍य मराठी वेब टीम | Nov 12, 2017, 16:29 PM IST

गुजरात- सोशल मीडियावरील वाढत्‍या लोकप्रियतेबाबत राहुल गांधी यांनी रविवारी स्‍पष्‍टीकरण दिले. बनासकांठा येथे काँग्रेसच्‍या सोशल मीडिया टीमसोबत झालेल्‍या चर्चेवेळी त्‍यांनी सांगितले की, 'महत्‍त्‍वाच्‍या मुद्दयांवर मी सूचना देतो आणि 3-4 लोकांची Pidi टीम यावर ट्विट करते.'
मागील काही दिवसांपासून राहुल यांचे अधिकृत ट्विटर हँडल 'OfficeofRG' वर रिट्विट्सच्‍या संख्‍येत प्रंचड वाढ झाली आहे. यावर ही कृत्रिम वाढ असल्‍याचा दावा एका वृत्‍तसंस्‍थेने केला होता. यासाठी एका ऑटोमेटेड सॉफ्टवेअरची मदत घेण्‍यात आल्‍याचेही सांगण्‍यात आले.
राजकीय मुद्द्यांवर माझे मत व्‍यक्‍त करतो
- गुजरातमधील बनासकांठा येथे काँग्रेसच्‍या सोशल मीडिया टीमच्‍या प्रश्‍नांना राहुल यांनी रविवारी उत्‍तरे दिली.
- सोशल मीडियावरील वाढत्‍या लोकप्रियतेबाबत प्रश्‍न विचारला असता त्‍यांनी सांगितले की, 'माझी Pidi ही टीम ट्विट करत असते. नीट विचार केला तर 4-5 शब्‍दांतही तुम्‍ही चांगल्‍या पद्धतीने व्‍यक्‍त होऊ शकता. ट्विटसबाबत सांगायचे तर मी काही सूचना देतो. नंतर त्‍यावर विचार करून टीम ट्विट करत असते. सामान्‍यत: शुभेच्‍छा संदेश, वाढदिवस यांसारखे रुटीन ट्विट्स मी करत नाही. उदाहरणार्थ अडवाणींचा वाढदिवस असेल तर त्‍यांना आमच्‍या ऑफिसतर्फे शुभेच्‍छा दिल्‍या जातात. मी काही इनपूट देतो. मात्र, महत्‍त्‍वाच्‍या राजकीय विषयांवर माझेच मत व्‍यक्‍त केले जाते.

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचे ट्विट केले होते रिट्विट
- सोशल मिडीयावरील राहुल गांधी यांच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेबा‍बत वृत्‍त्‍ससंस्‍था एएनआयने विदेशातून करण्‍यात येणा-या ट्विट्सचा हवाला दिला आहे.
- एएनआयने सांगितले आहे की, 'राहुल गांधी यांनी अमेरिकेचे अध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचे एक ट्विट रिट्विट केले होते. ट्विटमध्‍ये त्‍यांनी लिहिले होते की, 'मोदीजी घाई करा, लवकरच डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची गळाभेट घ्‍यावी लागेल, अस दिसतय.'
- राहुल गांधी यांच्‍या या ट्विटला ताबडतोब 20 हजार जणांनी रिट्विट केले. सध्‍या याला 30 हजार जणांनी रिट्विट केले आहे.

रिट्विटसबाबत वृत्‍तसंस्‍थेचे विश्‍लेषण
- वृत्‍तसंस्‍थेनूसार, राहुल गांधी यांच्‍या ट्विटला बोट्स नावाच्‍या सॉफ्टवेअरने रशिया, कजाखिस्‍तान आणि इंडोनेशिया या देशांतून रिट्विटस करण्‍यात आले. राहुल गांधी यांनी जागतिक विषयांसबंधी केलेल्‍या ट्विट्सलाच सर्वाधिक रिट्विट करण्‍यात आले आहे.

क्रिडाक्षेत्रात याला डोपिंग म्‍हणतात- क्रिडा मंत्री
- केंद्रीय क्रिडा मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी राहुल यांच्‍या ट्विट फॉलोअर्सबद्दल ए‍क ट्विट केले आहे. 'क्रिडा क्षेत्रात याला डोपिंग म्‍हणतात. डोपिंगचे नाव घेतल्‍यावर तुम्‍हाला कोणाचे नाव आठवते? विचार करुन पाहा', असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

राहुल गांधी रशियातून निवडणूक लढवणार का?- स्‍मृती इराणी
- सोशल मिडीयावरील वाढत्‍या लोकप्रियतेवरुन स्‍मृती इराणी यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे.
- त्‍यांनी ट्विट केले आहे की, 'राहुल गांधी काय रशिया, इंडोनेशिया, कजाखस्‍तानमधून निवडणूक लढवणार आहेत काय?'

Next Article

Recommended