आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा गुजरात दौरा : वापीमध्ये नवसर्जन यात्रेत झाले सहभागी, सूरतमध्ये सभा घेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत - राहुल गांधी सध्या साऊथ गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते वापीमध्ये नवसर्जन यात्रेत सहभागी झाले. आजच ते सूरतला पोहोचतील. सायंकाळी एका कार्यक्रमात ते कॉर्नर मिटींगमध्ये (नुक्कड सभा) सहभागी होतील. त्यानंतर त्यांचा ताफा वराछाला जाईल. त्याठिकाणी पाटीदार बहुल भागामध्ये ते एका सभेला संबोधित करतील. हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींच्या कार्यक्रमात पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS)चे वर्कर्स विरोध करणार नाहीत. तरीही प्रशासन खबरदारी म्हणून सीआरपीएफचे जवान तैनात करणार आहे. शुक्रवारी राहुल-हार्दिक पटेल यांची भेट होण्याच्या शक्यता मात्र धूसर आहेत. 
 
 
हार्दिक पटेल यांना भेटणार राहुल गांधी?
असे म्हटले जाते की, पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS)चे समन्वयक हार्दिक पटेल शुक्रवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेऊ शकतात. पण अद्याप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या वतीने असे काहीही म्हणण्यात आलेले नाही. हार्दिक पटेलला राजद्रोहशी संबंधित खटल्याप्रकरणी आजच (शुक्रवार) कोर्टात दाखल व्हावे लागणार आहे. अशा स्थितीत वराछामध्ये हहोणाऱ्या सभेमध्ये त्यांची राहुल गांधींशी भेट होण्याची शक्यता कमी आहे. हार्दिक पटेलने काँग्रेसला पाटीदार आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. 
 
 
काँग्रेससाठी दक्षिण गुजरातचे महत्त्व काय?
राहुल गांधींनी दक्षिण गुजरातमध्ये संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. त्यामागते कारण म्हणजे, दक्षिण गुजरात 90 च्या दशकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण गेल्या दीड शतकामध्ये या भागामध्ये भाजप अधिक बळकट झाले आहे. सूरत शहरातील तर सर्वच जागा भाजपच्या ताब्यात आहेत. दक्षिण गुजरातमध्ये सूरत, नवसारी, भरूच, वलसाड, नर्मदा, तापी, डांग जिल्हे आहेत. एकूण 35 जागा आहेत. यापैकी 28 जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. काँग्रेसकडे केवळ 6 तर एक जागा इतरांकडे आहे. येथील बहुतांश मतदार आदिवासी आहेत. अनेक जागांवर पटेल आणि कोळी जातीचे वर्चस्व आहे. 
 
 
गुजरातमध्ये केव्हा केव्हा गेले राहुल गांधी.. 
26 ते 28 सप्टेंबरपर्यंत राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर होते. यादरम्यान ते सौराष्ट्रच्या 5 जिल्ह्यांमध्ये गेले होते. त्यानंतर 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी मध्य गुजरातच्या 6 जिल्ह्यांचा दौरा केला. त्यानंतर राहुल गांधी 23 ऑक्टोबरला एका महिन्यात तिसऱ्यांदा गुजरातच्या दौऱ्यावर पोहोचले होते. राहुल गांधी गुजरातला जाण्याची ही चौथी वेळ आहे. 1 नोव्हेंबरला राहुल गांधी सूरत जिल्ह्याच्या मढीमध्ये पोहोचले होते. त्याठिकाणी वाट पाहणाऱ्यांनी राहुल यांना पाहताच जल्लोष केला होता. राहुल यावेळी सुरक्षा कडे तोडून तरुणांमध्ये गेले होते. त्यांच्याबरोबर सेल्फीही घेतले होते. 
 
 
निवडणुकीच्या आधी काँग्रेसची नजर कास्ट फैक्टरवर?
गुजरातमध्ये 30% ओबीसी मतदार आहेत. तसेच क्षत्रिय-हरिजन-आदिवासी मतदारांचे प्रमाण 21% आहे. ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांचा एकता मंच या सर्व समाजांचे प्रतिनिधित्व करतो. ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. म्हणजेच ठाकोर यांच्या माध्यमातून गुजरातची नजर 51% मतदारांवर आहे. तसेच काँग्रेस पाटीदारांनाही जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात यश मिळाल्यास त्यांची 20 टक्के मते मिळू शकतात. 
 
 
गुजरातमधील कास्ट फॅक्टर.. 
पाटीदार 20%
मुस्लिम 9%
पाटीदार+मुस्लिम29%
सवर्ण 20%
ओबीसी 30%
केएचए: क्षत्रिय, हरिजन आदिवासी 21%
सवर्ण+ओबीसी+केएचए 71%
 
पुढे वाचा, गुजराव विधानसभा निवडणुकीशी संबंधित FACTS
 
बातम्या आणखी आहेत...