आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये बनावट पदव्यांचे रॅकेट उघड; दोन डॉक्टर अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- गुजरात पोलिसांनी बनावट वैद्यकीय पदवीसह दोन डॉक्टरांना अटक केली आहे. यातून बनावट वैद्यकीय तसेच इतर पदवी प्रकरणाच्या देशव्यापी रॅकेटचा भंडाफोड झाला असून त्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अनेक राज्यांत असल्याचेही आढळून आले आहे. बनावट पदवी देणारे हे आरोपी आठ राज्ये, १४ विद्यापीठे तीन शिक्षण मंडळांची प्रमाणपत्रे पदव्या उपलब्ध करून देत होते. त्यात गुजरातशिवाय महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र आदी राज्यांचा समावेश आहे.

बनावट पदव्या वाटप करणारे हे आरोपी गुजरातमध्ये जामनगर जिल्ह्यात मागील साडेतीन वर्षांपासून सक्रिय होते. या प्रकरणाच्या सूत्रधाराने या एकाच जिल्ह्यात सुमारे १४४ लोकांना बनावट पदव्यांचे वाटप करून त्यांच्याकडून १.६ कोटी रुपयांना गंडा घातला. प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव पुष्कर उपाध्याय असे असून तो त्याचा मुलगा भृगू मुलगी दीपिका तसेच एजंटांच्या माध्यमातून हे नेटवर्क चालवत होता.

जामनगर ठाण्याचे पोलिस अधीक्षक प्रदीप शेजूळ यांनी सांगितले, बनावट पदवी रॅकेटप्रकरणी २० एजंट सक्रीय होते. ते इतर राज्यांत चोरून पदव्या पाठवत असत. राजकोट - जामनगरमध्ये कार्यालय सुरू करून त्यांनी २०० जणांना बनावट पदव्यांची खिरापत वाटल. पैकी काही लाभार्थींना लवकरच अटक केली जाणार आहे.

पोलिस सूत्रांनुसार या प्रकरणाचे धागेदाेरे दिल्लीपर्यंत असून त्याच्या तपासासाठी एक पथक दिल्लीला पाठवण्यात आले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)