आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये न्यायाधीशांना धमकीचे पत्र, ब्लँक कॉल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातच्या नरोडा पाटिया दंगलीचा ऐतिहासिक निकाल देणाऱ्या न्यायाधीश डॉ. ज्योत्स्ना याग्निक पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. आता त्यांना घरच्या पत्त्यावर धमकीचे पत्र आणि ब्लँक कॉलही येत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. न्या. डॉ. याग्निक निवृत्त असून अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्या आहेत.

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जी. आर. अलोरिया म्हणाले, डॉ. याग्निक यांनी गुप्तचर विभागाचे डी. जी. प्रमोदकुमार यांना पत्र लिहून धमकीची माहिती दिली. त्यांनी सुरक्षा वाढवण्याचीही मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालक निर्णय घेणार आहेत.
डॉ. याग्निक यांना नरोडा कांडची सुनावणी आणि निकालानंतर झेड श्रेणीची सुरक्षा पुरवली होती. वर्षभरात ती काढून वाय दर्जाची सुरक्षा करण्यात आली. डॉ. याग्निक यांनी या प्रकरणात काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...