(अहमदाबादमधील गरबा कार्य़क्रमात नृत्य करताना युवती.)
अहमदाबाद (गुजरात)- गुजराती लोकांचा सर्वांत आवडता उत्सव असलेल्या नवरात्रीतील गरबा शुक्रवारी समाप्त झाला. ही गरब्याची अंतिम रात्र होती. यावेळी तरुणाईचा उत्साही जल्लोष दिसून आला. तसे बघितले तर आता देशभरातील वेगवेगळ्या राज्यांत गरब्याची धूम दिसून येते. पण गुजरातमधील गरबा काहीसा विशेष असतो. यासाठी देश-विदेशातील नागरिक गुजरातला येत असतात.
गरबा गुजरातमधील पारंपरिक नृत्य प्रकार आहे. गुजराती समाजात गरब्याची मोठ्या आतुरतेने वाट बघितली जाते. याची सुमारे तीन महिन्यांपासून तयारी केली जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तर तरुणाईची जल्लोष अगदी डोळ्यांत भरून ठेवावा असा असतो.
पुढील स्लाईडवर बघा, गरब्यातील देखण्या अप्सरा...आणि चढलेला गुलाबी जल्लोष....