आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Govt Dismissed IPS Sanjiv Bhat Over Dereliction In Duty

मोदींनी असे संपविले कट्टर विरोधकाला, IPS संजीव भट्ट अखेर बरखास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- 1988 गुजरात बॅचचे आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अखेर बरखास्त करण्यात आले आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगली प्रकरणी पंतप्रधान आणि तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक म्हणून संजीव भट्ट चर्चेत आले होते. शासकीय कामात हलगर्जीपणा दाखविल्याने भट्ट यांना बरखास्त करण्यात आले आहे. जुनागडला बदली करुनही सेवेत रुजू न झाल्याने त्यांना बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
गुजरातचे मुख्य सचिव जी. आर. आलोरिया यांनी याची माहिती दिली आहे. राज्य सरकारने जुनागड येथे बदली केल्यावरही संजीव भट्ट अहमदाबादमध्ये राहिले. त्यांनी सरकारी गाडी आणि पोलिस कमांडो यांची सेवा घेतली. राज्य सरकारने त्यांना अनेक वेळा नोटीस बजावली होती. पण त्यांच्या वागणुकीत काही बदल झाला नाही. त्यामुळे त्यांना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना संजीव भट्ट म्हणाले, की होय मला बरखास्त करण्यात आले आहे. असे होईल असे वाटले नव्हते. या प्रकरणी करण्यात आलेला तपास पक्षपाती होता. केवळ दिखावा म्हणून तो करण्यात आला होता.
2011 पासून निलंबित असलेल्या भट्ट यांनी गुजरात दंगलीसाठी नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे म्हटले होते. गोधरा येथे ट्रेन जाळण्यात आल्यावर मोदी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात मोदी म्हणाले होते, की हिंदू समाजाला बदला घेण्याची संधी द्यायला हवी.
पुढील स्लाईडवर बघा, बरखास्तीवर संजीव भट्ट यांनी टाकलेले ट्विट आणि बरखास्तीचा आदेश...