आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक लढवण्यासाठी शौचालय अनिवार्यच; गुजरात हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद-निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीच्या घरात शौचालय अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या अटीवर गुजरात उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
ज्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवायची असेल तिच्या घरात शौचालय असणे आवश्यक आहे, नसता अर्ज रद्द होईल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. नव्या नियमानुसार उमेदवाराच्या घरात शौचालय असल्याची पुष्टी करणारे तलाठ्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत गुजरात सरकारने कायद्यात बदल केला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.ज्याच्या घरी शौचालय नाही ती व्यक्ती निवडणूक लढवू शकणार नाही, असा कायदा गुजरातमध्ये आहे. दाहोद जिल्ह्यातील झपटिया ग्रामपंचायतीच्या सरपंचासहित सहा लोकांना या नियमाचा फटका बसला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज रद्द ठरवला आहे. पाच जणांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
बातम्या आणखी आहेत...