आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat High Court Allowed Pleas In English Language Only

गुजरात हायकोर्टात फक्त इंग्रजीतील युक्तवाद ऐकून घेतला जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरात हायकोर्टात यापुढे फक्त इंग्रजीमध्येच युक्तीवाद करताय येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. स्वतःचा खटला चालवत असले तरी इंग्रजीचाच वापर करावा लागणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हायकोर्टाची भाषा इंग्रजी आहे आणि जोपर्यंत सरकार त्यात सुधारणा करत नाही तोपर्यंत पक्षकारांना हायकोर्टासमोर इंग्रजी भाषेचाच वापर करावा लागणार आहे. पक्षकार आपले म्हणणे फक्त गुजराती भाषेत लिखित स्वरुपात मांडू शकतात.
पार्टी इन पर्सन (स्वतःचा खटला स्वतः लढणे) प्रकरणात वेगवेगळ्या भाषेंचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला आहे. एक सदस्यीय पीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे, की अर्जदार हिंदी किंवा गुजरातीमध्ये आपले म्हणणे मांडू इच्छितात, मात्र हायकोर्टच्या कामकाजाची भाषी इंग्रजी आहे.
राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात इतर भाषांतही कामकाज
राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश हायकोर्टात इंग्रजीसह इतर स्थानिक भाषांमध्येही कामकाजाला मान्यता आहे. त्यामुळे येथे इंग्रजीसह हिंदी आणि स्थानिक भाषेत कामकाज होते.
महाधिवक्ता कमल त्रिवेदी यांनी सांगितले, की गुजरात हायकोर्टात फक्त इंग्रजी भाषेमध्येच कामकाज होऊ शकते. त्यात फेरबदल करण्याचा सरकार विचार करत आहे. त्यासाठीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.