आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खाकीवर चढला प्रेमाचा रंग, ही मराठवाडी जोडी असेल गुजरात कॅडरचे पहिले IPS कपल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमध्ये पती-पत्नी दोघेही आएएस अधिकारी किंवा एक आयएएस आणि दुसरा आयपीएस असणे यात काही नवल नाही. मात्र पती-पत्नी दोघेही आयपीएस हा योगायोग प्रथमच जुळून आला आहे. येत्या चार जून रोजी दोन आयपीएस अधिकारी विवाह बंधनात अडकणार आहेत. भरुचच्या पोलिस अधिक्षक शोभा भूतडा आणि जामनगरचे पोलिस अधिक्षक प्रदीप शेजूळ बोहल्यावर चढणार आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही मराठवाड्यातील आहेत.
कोचिंग क्लासपासून सुरु झाली लव्हस्टोरी
शोभा भूतडा या मराठवाड्यातील लातूरच्या तर प्रदीप शेजूळ मराठवाड्याची राजधानी औरंगाबादचे आहेत. दोघांची पहिली भेट स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना कोचिंग क्लासमध्ये झाली. दोघेही एकाच क्लासचे विद्यार्थी होते. येथूनच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. दोघांची इच्छा होती, की केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दोघांनी एकाच वेळी उत्तीर्ण व्हावे आणि योगायोग असा की ते एकाच वर्षी पास झाले. दोघांची निवड आयपीएससाठी झाली आणि सोबतच ते ट्रेनिंगसाठी गेले आणि दोघांना नियुक्ती देखील एकाच राज्यात अर्थात गुजरातमध्ये मिळाली.
नारायण साई प्रकरणाच्या तपासात शोभा होत्या चर्चेत
शोभा भूतडा या गुजरातच्या दबंग आयपीएस अधिकारी म्हणून परिचीत आहेत. त्यांनी अनेक मोठ-मोठ्या प्रकरणांचा पर्दाफाश करुन आरोपींना तुरुंगात डांबले आहे. मात्र त्या सर्वाधिक चर्चेत आल्या त्या स्वयंघोषित संत आसारामचा मुलगा नारायण साईच्या बलात्कार प्रकरणानंतर. या प्रकरणाचा त्यांनी बारकाईने अभ्यास करुन जबाबदार पोलिस अधिकारी काय करु शकतो याचा वस्तूपाठ घालून दिला.
जीवे मारण्याचा धमक्या
सूरतच्या दोन बहिणींनी आसाराम आणि नारायण साईवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर साई दोन महिने फरार होता. या प्रकरणाचा तपास शोभा याच करत होत्या. या दरम्यान त्यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाइलवर धमक्या येत होत्या. साईचा तपास बंद करा अन्यथा जीवानीशी जाल, अशा त्या धमक्या होत्या. धमकी देणारा अशोक यादव यालाही शोभा यांनी जेरबंद केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा शोभा भूतडा आणि प्रदीप शेजूळ यांची छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...