आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावाच्या मातीचा गंध फुलवतोय विकास, गुजरातेत बदलले अनेक गावांचे रूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत (गुजरात) - म्हणतात, गाव सोडून गेले की त्या गावाच्या मातीचा गंध कधीच मनातून जात नाही. एक अनामिक ओढ कायम राहते. अशाच भावनेतून दक्षिण गुतरातमधील काही गावांत विकासगंगा वाहते आहे. येथून काही लोक परदेशात गेले, परंतु ते गाव विसरले नाहीत. आज ही अनिवासी भारतीय मंडळी गावासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत.
आपण ज्या गावात शिकलो, वाढलो ते गाव परदेशातील गावांसारखेच चकचकीत दिसले पाहिजे, ही या मंडळीची जिद्द आहे. म्हणूनच दक्षिण गुजरातमधील 123 गावांतील लोकांना आता हव्या त्या सुविधा मिळू लागल्या आहेत. वीर नर्मद विद्यापीठाच्या समाजशास्त्र केंद्राने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. एनआरआयना गुजरातमध्ये एनआरजी (नॉन रेसिडंट गुजराती) असेही संबोधले जाते. किंबहुना त्यांची हीच ओळख इथे प्रचलित आहे. या भागातील बहुतांश लोक अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, द. आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांत आहेत. मात्र, गाव सोडले तरी हे लोक आपल्या गावाच्या सरपंचाशी संपर्कात आहेत. ही परदेशात असलेली मंडळी रोख मदत देऊ करतात. ही मदत लाख-कोटींच्या घरात असते.


सुविधांनाही प्राधान्य
सर्वेक्षणानुसार अनिवासी भारतीयांच्या मदतीतून सर्वाधिक विकास कार्य बार्डोली तहसीलअंतर्गत 41 गावांत झाले आहे. हीच स्थिती सुरत जिल्ह्यातील नऊ तहसीलमधील 123 गावांत दिसून येते. बार्डोलीतील ऐना गावात तर अगदी परदेशातील आधुनिक सुविधांसारख्या सर्व सुविधा मिळत आहेत.


मदत या कामांसाठी...
> पायाभूत क्षेत्र, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, जनरेटर, रस्ते तसेच सांडपाण्याची व्यवस्था यासाठी परदेशातून मदतीचा ओघ सुरू असतो.
> विधवा तसेच निराधार वृद्धांनाही एनआरआयकडून मिळणार्‍या निधीतून चांगली मदत होत आहे.
> सामूहिक विवाह सोहळ्यांना ही परदेशी मंडळी प्रोत्साहन देते. जेणेकरून लोकांनी खर्चिक विवाह टाळावेत.