आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातला तीन वर्षांत तिसरा CM : रूपाणींनी घेतली शपथ; पटेल समाजाचे आठ नवे मंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - विजय रुपाणी यांनी आज (रविवार) गांधीनगर गुजरातच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची तर नितीन पटेल गुजरातीतून शपथ घेतली. मागील तीन वर्षांत ते गुजरातचे तिसरे मुख्‍यमंत्री आहेत. राज्‍यपाल ओ. पी. कोहली यांनी त्‍यांना शपथ दिली. रुपणी यांच्‍या मंत्री मंडळात सौरभ पटेलसह 9 मंत्र्यांना स्‍थान मिळाने नाही. दरम्‍यान, पटेल समाजाच्‍या 8 जणांनी मंत्री म्‍हणून शपथ घेतली. या सोहळ्याला लालकृष्ण आडवाणी आणि अरुण जेटली यांच्‍यासह इतर अनेक मोठे नेते उपस्‍थ‍ित होते. 1 ऑगस्‍ट रोजी आनंदीबेन पटेल यांनी फेसबुकवर आपल्‍या राजीनाम्‍याची माहिती दिली होती.

सायंकाळी चार वाजता अचानक परिस्थिती बदलली...
> आपले नाव नक्की झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नितीन पटेल यांनी भावी सीएमचा अजेंडा काय असेल याबद्दल मीडियामध्ये मुलाखती देण्यास सुरुवात केली. पण सायंकाळी चार वाजता अचानक वातावरण पालटले.
> दोन तासानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा झाली. रुपाणी यांच्या नावाला भाजपाध्यक्ष अमित शहांची पसंती असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे पायउतार झालेल्या आनंदीबेन या नितीन पटेल यांच्यासाठी आग्रही होत्या.
> दोन दिवसांपूर्वी झालेल्या घोषणेनुसार विधीमंडळ पक्षनेत्याची निवड आमदारांच्या बैठकीत करण्याचे ठरले होते. मात्र त्यासाठीची बैठक दोन तास उशिरा सुरु झाली. त्याआधी वरिष्ठ नेत्यांची वेगळी बैठक झाली आणि त्यामध्येच गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या निवड झाली. आमदारांच्या बैठकीत त्या नावाची फक्त औपचारिक घोषणा झाली.
दोन तासांत ठरले रुपाणींचे नाव
> सायंकाळी चार वाजता अमित शहा, आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री आणि गुजरात निरीक्षक नितीन गडकरी, पक्षाच्या महासचिव सरोज पांडे, प्रभारी दिनेश शर्मा आणि संयुक्त सचिव व्ही. सतीश यांची बैठक झाली.
> या बैठकीत आनंदीबेन आणि शहा यांच्यात वादळी चर्चा झाली. शहा नितीन पटेल यांच्या नावाला होकार देण्यास तयार नव्हते.
> यामुळे चिडलेल्या आनंदीबेन यांनी शहांवर त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला. मोदी केंद्रात गेल्यानंतर प्रथमच गुजरातचा वाद चव्हाट्यावर आला होता.
> आनंदीबेन पटेल यांनी आरोप केला, की पाटीदार आंदोलन हा सरकार अस्थिर करण्याच्या षडयंत्राचाच एक भाग होता.
> दरम्यान, व्ही. सतीश बैठकीतून बाहेर गेले आणि त्यांनी मोदींशी संपर्क केला. त्यानंतर नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला समोर आले.
मोदींचे तीन संकेत
> गुजरातमध्ये आगामी निवडणूक ही 'पटेल फॅक्टर' ऐवजी 'मोदी फॅक्टर'वरच लढली गेली पाहिजे.
> मोदींना कोणत्याही जातीय दबावापुढे झुकणे पसंत नाही.
> जो सर्वात वेगाने पुढे जाईल, स्वतःला बेस्ट समजेल, तो मागे राहील.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, शहांसमोर नाही झुकले नितीन पटेल
> म्यानमारमध्ये जन्मलेले रुपाणी आणीबाणीत होते जेलमध्ये
बातम्या आणखी आहेत...