आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gujarat News In Marathi, Video Camera And Touch Screen Machine In Gujarat Police Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातच्या पोलिस ठाण्यांमध्ये टचस्क्रीन, व्हिडिओ रेकॉर्डिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातच्या पोलिस ठाण्यांमध्ये लवकरच कॅमेरायुक्त असे अत्याधुनिक टचस्क्रीन मशीन लावण्यात येणार आहे. त्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी कोणत्याही शिफारशीची अथवा चिरीमिरी देण्याची गरज पडणार नाही. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिलाच, तर व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग करून थेट जिल्हा पोलिस मुख्यालयात आपली तक्रार पाठवण्याची सोयही करण्यात आली आहे.
इच्छा असूनही अनेक जण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास धजावत नाहीत. त्यावर हा रामबाण उपाय करण्यात आला आहे. अहमदाबादेतील पोलिस ठाण्यांमध्ये ही सोय करण्यात येणार असून देशात हा प्रयोग करणारे अहमदाबाद पहिलेच शहर असल्याचा दावा जिल्हा पोलिसांनी केला आहे. पुढील महिन्यात टचस्क्रीनचा उपयोग सुरू होणार आहे.
प्रत्येक ठाण्यात मशीन
अहमदाबादच्या प्रत्येक ठाण्यात एक हे टचस्क्रीन मशीन ठेवण्यात येणार आहे. केवळ एक बटण दाबून संबंधिताच्या तक्रारीचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. ही रेकॉर्डिंग थेट पोलिस मुख्यालयात पाठवता येऊ शकेल.